'छावा' चित्रपटाने काही तासांमध्ये 'या' 7 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला, 2025 मध्ये रचला इतिहास

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना 'छावा'ने मागे टाकले आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 14, 2025, 06:34 PM IST
'छावा' चित्रपटाने काही तासांमध्ये 'या' 7 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला, 2025 मध्ये रचला इतिहास  title=

Chhaava Box Office Collection Day 1: विकी कौशलचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'छावा' चित्रपट व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पहिल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. तर ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांना आता प्रचंड उत्सुकता लागली आहे. कारण, चित्रपट पाहणाऱ्यांनी चित्रपट जबरदस्त असल्याचं म्हटलं आहे. 

आता याच कारणामुळे 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात कलेक्शन करत असल्याच दिसून येत आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या वर्षी प्रदर्शित झालेले सर्व बॉलिवूड चित्रपट फ्लॉप झाले आहेत. अशा परिस्थितीत आता 'छावा'चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन पाहता असे दिसते आहे की, 'छावा' चित्रपट या वर्षीचा बॉलिवूडचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरू शकतो. 

'छावा' चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन

विकी कौशलचा 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला आहे. सैक्निल्कच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत 'छावा' चित्रपटाने 12.51 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

ही आकडेवारी सायंकाळी 5.15 मिनिटांपर्यंतची आहे. यामध्ये बदल होऊ शकतात. आम्ही तुम्हाला चित्रपटाच्या आकडेवारीशी संबंधित नवीनतम अपडेट्स वेळोवेळी देत ​​राहू.

'छावा'ने पहिल्या दिवशी 7 चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले

2025 च्या सुरुवातीला 'इमर्जन्सी' आणि 'आझाद' चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यांचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 2.5 कोटी आणि 1.5 कोटी रुपये होते. यानंतर  'स्काय फोर्स' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 12.25 कोटी आणि 'देवा'ने 5.5 कोटी रुपयांची कमाई केली. 'लवायपा' आणि 'बदास रविकुमार' या चित्रपटांनी देखील पहिल्या दिवशी 1.25 कोटी आणि 2.75 कोटी रुपयांची कमाई केली. तर नागा चैतन्यच्या 'थंडेल' या चित्रपटानेही पहिल्या दिवशी 11.5 कोटींची कमाई केली.

जर आपण या सर्व चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवर नजर टाकली तर हे स्पष्ट होते की 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांमध्ये या चित्रपटाने या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर, सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने आधीच 17.89 कोटी रुपयांची कमाई केली आहे.