Saving Account मध्ये किती पैसे ठेवता येतात? आकडा लक्षात ठेवा नाहीतर येईल इनकम टॅक्स विभागाची नोटीस

Bank Savings Account Deposit Rules : बँकेत खातं सुरु करत असताना त्यासंदर्भातील नियमांची माहिती असणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. 

सायली पाटील | Updated: Jul 15, 2024, 12:24 PM IST
Saving Account मध्ये किती पैसे ठेवता येतात? आकडा लक्षात ठेवा नाहीतर येईल इनकम टॅक्स विभागाची नोटीस  title=
How much Amount you can keep in Bank Saving Account

Bank Savings Account Deposit Rules : बँकेत खातं सुरु करून त्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या सवयीचा फायदा अनेकांनाच होते. अडीनडीच्या वेळेला कळत- नकळत या खात्यामध्ये जमा केलेल्या रकमेचा फायदा खातेधारकांना होतो. अनेकदा ही रक्कम वापरून एक कमाल गुंतवणूकही करता येते. भारतामध्ये बँकेच्या नियमांअंतर्गत Saving Account सुरु करण्यासाठी कोणत्याही प्राथमिक रकमेची गरज नाही. 

थोडक्यात, सेव्हिंग अकाऊंट सुरु करण्यासाठी एकाही रुपयाची आवश्यकता नाही. पण, या सेव्हिंग अकाऊंटमध्ये नेमकी किती रक्कम असणं अपेक्षित आहे, किंवा इथं केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीची नेमकी मर्यादा काय आहे, तुम्हाला माहितीये? 
 
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, Saving Account मध्ये सेव्हिंग अकाऊंटमध्ये जास्तीत जास्त किती रक्कम जमा असणं अपेक्षित आहे याची मर्यादा नाही. पण, वर्षभरात जर तुमच्या खात्यावर 10 लाखांहून अधिक रक्कम जमा होते, तर त्याची माहिती बँक सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेज (CBDT)ला देते. एफडी, कॅश डिपॉझिट, म्युच्युअल फंड, बाँड आणि शेअरमधील गुंतवणुकीवरही हा नियम लागू असतो. 

हेसुद्धा वाचा : SBIचा सर्वसामान्यांना झटका; कर्ज महागले, 30 लाखांच्या Home Loanवर किती वाढेल EMI?

जाणकारांच्या माहितीनुसार कोणतीही भारतीय व्यक्ती देशातील कोणत्याही बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये कितीही रक्कम ठेवू शकते. Saving Account मध्ये रक्कम जमा करण्याच्या मर्यादेसंदर्भात कोणताही नियम नसून, फक्त या खात्यातील जमा रकमेवर जे व्याज मिळतं त्यावर मात्र खातेधारकानं कर भरणं अपेक्षित असतं. 

10 टक्के टीडीएस 

बँकेकडून 10 टक्के टीडीएस कापला जातो. पण, इथंही कर सवलत मिळवता येते. आयकर कायद्यातील कलम 80 टीटीएनुसार सर्व व्यक्तींना 10 हजारांपर्यंतची कर सवलत उपलब्ध आहे. थोडक्यात 10 हजार किंवा त्याहून कमी व्याज असल्यास कर सवलत मिळते. तर, 60 वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचं व्याज करमुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान, सेव्हिंग अकाऊंटमध्ये जमा होणाऱ्या रकमेसंदर्भात आयकर विभागाकडून रितसर चौकशी होते. इथं खातेधारकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील कारवाई केली जाते. त्यामुळं सेव्हिंग अकाऊंट अर्थात बचत खात्यातील रकमेवर कायम लक्ष असूद्या.