मुंबई : देशाची चिंता वाढवणारी बातमी. कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढीचा (COVID19 cases) उच्चांक नोंदवला गेला आहे. गेल्या 24 तासांत देशात 1,15,736 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याआधी 5 एप्रिलला पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार करत सर्वाधिक रुग्णवाढ झाली होती. यासोबत देशातील रुग्णांची एकूण संख्या 1,28,01,785 इतकी झाली आहे. गतवर्षी 17 सप्टेंबरला देशात 97 हजार 894 रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाकाळातील ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ होती. मात्र, आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने हा नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे.
देशात गेल्या 24 तासात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात देशात 1,15,736 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 1,28,01,785 इतकी झाली आहे. तसेच अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 8,43,473 लाखांवर पोहोचली आहे. (India reports 1,15,736 new COVID19 cases, 59,856 discharges, and 630 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry)
कोरोना सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय 2021मध्ये भारतात 600 पेक्षा जास्त लोकांचे मृत्यू झाले असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात आतापर्यंत 1,66,177 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
India reports 1,15,736 new #COVID19 cases, 59,856 discharges, and 630 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,28,01,785
Total recoveries: 1,17,92,135
Active cases: 8,43,473
Death toll: 1,66,177Total vaccination: 8,70,77,474 pic.twitter.com/ugUgrvvy67
— ANI (@ANI) April 7, 2021
दरम्यान महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 55 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली असून दिल्लीत 5 हजारांच्यावर नवे रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लसीकरणावर भर देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 8,31,10,926 लसचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत दिलेल्या एकूण लसपैकी 60 टक्के महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सकाळी 7 वाजेपर्यंत लसीकरण मोहिमेच्या 80 व्या दिवशी एकूण, 43,00,966 डोस देण्यात आले, त्यापैकी 39,00,505 लाभार्थ्यांना प्रथम डोस देण्यात आला आणि 4,00,461 लाभार्थ्यांना दुसरा देण्यात आला डोस.
देशातील कोरोनास्थिती आणि लसीकरण मोहिमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. लसीकरणाचा वेग वाढविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात येण्याची शक्यता आहे.