Stridhana Right of Women: स्त्रीसाठी लग्न (Marrige) हा एक खूप मोठा सोहळा असतो. त्यातून लग्नाच्या वेळी मिळणारं स्त्री धनही (Stridhana) हेही तितकेच अमूल्य आणि महत्वाचे असते. आपल्यालाही याची किंमत ठाऊक असतेच त्यामुळे प्रत्येक स्त्री आपलं स्त्रीधन कसं सुरक्षित (Safety) राहील याकडे लक्ष देते. आजच्या काळातील स्त्री ही जास्त स्वतंत्र झाली आहे. त्यातून ती तिच्या हूशारीवर आणि जिद्दीवर आपलं चांगलं करिअरही उभं करू शकते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीसाठी आपलं स्त्री धन हे फार महत्त्वाचेही ठरते. तिच्यासाठी ती ही तिची स्वत:ची मिळकत असते आणि त्यासाठी तिला काही फार करायची गरज लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया की अशा कोणकोणत्या परिस्थितीत स्त्री धन हे महत्त्वाचे असते. या आंतरराष्ट्रीय वूमन्स डेच्या (International Women's Day) निमित्ताने जाणून घेऊया की आपल्याला मिळणाऱ्या स्त्री धनाचे महत्त्व काय आहे आणि ते आपल्याला आपल्या भविष्यात कसे उपयुक्त ठरेल. (international womens day 2023 what is stridhana by hindu law how women can claim their right trending news marathi)
प्रत्येक स्त्रीला तिच्या माहेरच्यांकडून अथवा सासरच्यांकडून लग्नात किंवा मुलगी, सून म्हणून जे काही धन, मौल्यवान भेटवस्तू या खूप म्हत्त्वाच्या असतात कारण ते स्त्री धन असते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की या स्त्रीधनाचे म्हत्त्वा काय आणि कायद्याच्या (What is Stridhana by Hindu Law) दृष्टीनं हे किती महत्त्वाचे आहे. या स्त्रीधनाचे विविध पैलू आहेत जे प्रत्येक स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासाठी प्रत्येक स्त्रियांना आपल्याला या स्त्री धनाचे महत्त्व स्पष्ट होणे अधिक महत्त्वाचे आहे.
आपल्याला वाटतं असते आपल्याकडे असणारी संपत्ती ही आपण कोणाला आरामात देऊ शकतो. आपल्या आप्तांनाही आपल्याला ती सहज देता येईल. त्यासोबतच असेही वाटते राहते की आपल्यालाही त्यांच्या संपत्ती (Property of Women) आपले आप्त आपल्याला देतील परंतु असे नसते. काही वेळा आपल्याला अशा काही गोष्टींची नीट काळजी घेणे बंधनकारक राहते. अनेकदा काही केसेसमध्ये असे लक्षात आले आहे की स्त्रीयांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या नात्यातही दुरावा येऊ शकतो. त्यातून जर लग्नात तुम्हाला मिळालेले धन अथवा काही मौल्यवान भेटवस्तू सासरच्यांनी परत करण्यास नकार दिला तर त्यानं खूप मोठी समस्या उद्भवू शकते. तेव्हा लक्षात घ्या की तुम्हाला यासाठी खूप काही गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा अशावेळी आपल्या स्त्री धनाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.
हेही वाचा - Shreya Bugde: श्रेया बुगडेवर चाहते नाराज कारण ठरला सागर कारंडे; जाणून घ्या नक्की असं घडलं काय
सर्वप्रथम तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की, तुमचे स्त्रीधन हे तुमच्याकडे नसेल आणि ते तुम्ही तुमच्या अगदी विश्वासू आणि जवळच्या व्यक्तीकडे दिले असेल तर त्यासाठी तुम्ही ज्या व्यक्तीकडे तुमचे स्त्री धन दिले आहे त्याला ट्रस्टी (Trusty) असे संबोधले जाते. समजा एखाद्या महिलेचा मृत्यू झाला तर त्यानंतर अशी व्यक्तीची मदत होते. हिंदू उत्तराधिकार अधिनियम (Hindu Law), 1956 चे कलम 14 आणि हिंदू विवाह अधिनियम, 1955 चे कलम 27 यांच्या अधिकारानुसार स्त्रीधन आपल्याकडे ठेवण्याचा संपुर्ण अधिकार स्त्रियांना आहे. त्या कधीही त्या विकूही शकतात अथवा ठेवूही शकतात. तुमच्या मनाविरूद्ध जर का कोणी तुमचे स्त्रीधन ठेवत असेल तर त्या व्यक्तीविरूद्ध कायद्याचा आधारही घेऊ शकतात. तुमच्या सासरेचेही त्यावर अधिकार सांगू शकत नाहीत.