नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पोलिसांना आता बुलेटप्रुफ वाहनं दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पोलिसांसाठी बुलेटप्रुफ वाहनं खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने निधीही दिल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.
राजनाथ सिंह हे चार दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलिसांसोबत चर्चा करताना ही माहिती दिली. १६ जून रोजी अनंतनाग जिल्ह्यात फिरोज अहमद आणि सहा पोलिसांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी पोलिसांचं योगदान मोठं आहे, या ठिकाणी पोलीस खुपचं आव्हानात्मक परिस्थितीत राहतात. जम्मू-काश्मीरमधील पोलिसांचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.