महाराष्ट्रात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, कोणते मुद्दे राहिले चर्चेत?

Vidhansabha Election campaign: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी थांबली.मागील 12 ते 13 दिवस सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यायत. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 18, 2024, 08:56 PM IST
महाराष्ट्रात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, कोणते मुद्दे राहिले चर्चेत? title=
प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vidhansabha Election campaign: मागील काही दिवसांपासून राज्यात धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावलेत. जाहीर प्रचार थांबला असला तरी वैयक्तिक गाठीभेटी आणि आणि प्रचार सुरूच राहणार आहे. अनेक महत्वाच्या प्रचारातील मुद्द्यांनी राज्याचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं.प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांचे कोणते महत्वाचे मुद्दे लक्षणीय होते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी थांबली.मागील 12 ते 13 दिवस सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यायत. मात्र जाहीर प्रचाराची मुदत संपली असली तरी उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्रचाराच्या पद्धतींचा अवलंब करताना पाहायला मिळताहेत. मुंबईच्या प्रचारात खासकरून धारावी पुनर्विकास प्रकल्प,धारावीच्या नावाखाली अदानींना दिल्या जात असलेल्या मुंबईतील इतर जमिनी, मुंबईतील अर्धवट पायाभूत विकासाचे प्रकल्प,मुंबई महापालिकेतील विविध घोटाळ्यांचे मुद्दे,कोळीवाड्यांचा विकास,एंट्रीगेट टोलमुक्ती आणि  अर्धवट झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प हे मुद्दे चर्चेत राहिले.

मराठवाड्यात मराठा आणि ओबीसी आरक्षण हे महत्वाचे मुद्दे प्रचारामध्ये गाजल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यातील प्रचारातील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण आणि अंमलबजावणी सोयाबीनचे पडलेले भाव, हमीभावाची मागणी, व्होट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध, मराठवाडा वॉटर ग्रीड मंजूर करण्याची मागणी, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे महत्वाचे राहिले. 

निवडणुकीत पैशांचा पाऊस, हॉटेलमध्ये सापडले  जवळपास 2 कोटी

तब्बल 1 कोटीं 98 लाख  रुपये नाशिकमधील एका हॉटेलमध्ये सापडलेत.पाचशे रुपयांच्या नोटींची ही बंडल कुणाची आहे याचा तपास  सुरू आहे.मात्र निवडणुकीसाठीच ही रक्कम आणल्याची माहिती आहे. नाशिकमधील या हॉटलेमध्ये कोट्यवधी रुपये येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाला मिळाली होती.त्यानुसार आयोगाच्या अधिकाऱ्याची गाडी हॉटेलमध्ये शिरली. टीप मिळाल्यानुसार हॉटेलमधील या खोलीत अधिकारी दाखल झालेत. त्यांनी तपास केल्यानंतर त्यांना ह्या बॅग मिळाल्यात.या बॅगमधील नोटांची बंडल पाहून अधिकारीही चक्रावलेत.निवडणूक आयोगाचे अधिकारी हे पैसे कुणाचे आहे आणि कशासाठी आणले होते याचा तपास आता करताहेत. राजकीय धागेदोऱ्यांचा आयोग आणि पोलिस शोध घेताहेत. हॉटेलमध्ये सापडलेली ही रक्कम शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सदानंद नवले यांच्या गाडीत सापडल्याची चर्चा होती..मात्र त्यांनी याबाबत खुलासा केलाय.पैशांचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचं नवले यांनी स्पष्ट केलंय. मतदानासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहे.. त्या पार्श्वभूमीवर पैशांचा पाऊस पडतांना दिसतोय.काही कोटींची रक्कम सापडली पण गुप्त मार्गानं अनेक ठिकाणी पोहोचलेल्या कोट्यवधी रुपयांचं काय असा सवाल आता विचारला जातोय.