मुंबई : आपण केव्हाही आकाशात पाहिले तर आपल्याला ढगांचा रंग पांढरा दिसतो. तुम्ही रात्रीच्या वेळी देखील पाहिलंत, तरी देखील आकाशात तुम्हाला पांढरे शुभ्र ढग दिसतील. परंतु हेच ढग जेव्हा आपण पावसाळ्यात पाहातो. तेव्हा पाण्याने भरलेले ढग आपल्याला काळे दिसतात. तसे पाहिले तर, पाण्याला रंग नसतो. मग हे ढग पावसाळ्यात आपल्याला काळे का दिसतात? तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का? तर आज आम्ही तुम्हाला या मागील उत्तर सांगणार आहोत.
खरेतर ढग जेव्हा पाणी वाहून आणतात तेव्हा त्यातील पाण्याचे थेंब किंवा सूक्ष्म कण सूर्यापासून निघणाऱ्या किरणांना परावर्तित करतात.
सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा ढगांमध्ये पाणी नसते तेव्हा, सुर्यापासून निघणारे किरण ढग शोषून घेतात. म्हणूनच आपल्याला ढगाचा रंग पांढरा दिसतो.
आपण या प्रकारे देखील समजू शकता. ढगांमध्ये पाण्याचे थेंब असतात, ते सूर्यापासून निघणाऱ्या किरणांच्या तरंगलांबीपेक्षा मोठे असतात आणि सूर्याची किरणे त्यांच्यावर पडताच ते परावर्तित होतात आणि ढग आपल्याला पांढरे दिसू लागतात.
परंतु जर या उलट प्रक्रिया झाली, तर ढग आपल्याला काळे दिसतात. म्हणजे जेव्हा ढगातील पाण्याचे थेंब सर्व रंग शोषून घेतात तेव्हा ढगांचा रंग काळा दिसतो.
ढग काळ्या रंगाचे दिसण्याचे आणखी एक कारण म्हणजे, जर ढग खूप दाट आणि उंच असतील तर ते गडद दिसतील. त्याच वेळी, ढगांच्या गडद रंगामागे जाडी हे देखील एक कारण आहे. ढगांची घनता जास्त असेल तर सूर्याची किरणे त्यातून जातील. त्याचा परिणाम असा होईल की, ढग गडद किंवा काळे दिसतात.