शेव्हिंग केल्यावर हात आणि पायावरचे केस खरच जाड आणि कडक होतात का? जाणून घ्या

Hair Shaving: अनेकदा आपण असे ऐकले असेल की शेव्हिंग केल्यावर पुन्हा येणारे केस जाड आणि कडक झाले आहेत, पण यात नक्की तथ्य आहे का? याबद्दल जाणून घेऊयात. 

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 28, 2025, 01:57 PM IST
शेव्हिंग केल्यावर हात आणि पायावरचे केस खरच जाड आणि कडक होतात का? जाणून घ्या  title=
Photo Credit: Freepik

Does Shaved Hair Grow Back Thicker: महिला वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रेस घालतात. याच मुळे आपले पाय आणि हात छान दिसावे म्हणून हात आणि पायावरचे केस काढले जातात. हे केस काढण्यासाठी वेगेवगेळ्या पद्धतीचे वॅक्सिंग किंवा मग शेव्हिंग केले जाते. पण याविषयी अनेक तथ्य आणि गैरसमज आहेत. नक्की कोणती पद्धत उपयुक्त आहे याबद्दल अनेकदा चर्चा होते. आपण अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की जेव्हा आपण आपल्या हात किंवा पायावरचे केस शेव्हिंग करून काढतो तेव्हा पुन्हा येणारे केस घट्ट आणि कडक येतात. पण त्यात काही तथ्य आहे का? चला यात किती सत्यता आहे आणि विज्ञान याबद्दल जाणून घेऊयात. 

केसांची रचना समजून घ्या

खरं तर, केस हे शरीराच्या बाहेरील भागात आढळणाऱ्या केराटिनपासून बनलेले असतात. या केसांची वाढ त्वचेखाली असलेल्या फॉलिकल्सपासून वाढतात. जेव्हा आपण त्वचेपासून केस कापतो अर्थात शेव्हिंग करतो तेव्हा आपण फक्त त्यांची बाह्य पृष्ठभाग कापला, तर मूळ म्हणजे फॉलिकल्स आत राहतात. हेच कारण आहे की या प्रक्रियेचा केसांच्या जाडीवर  कोणताही परिणाम होत नाही. सोप्या भाषेत समजावून सांगायचे तर, जेव्हा तुम्ही केस कापता तेव्हा त्यांच्या मूळ रचनेत किंवा त्यांच्या वाढीत कोणताही बदल होत नाही. त्यामुळे शेव्हिंग केल्याने पुन्हा येणारे केस हे जाड आणि कडक येत नाहीत. 

हे ही वाचा: कपूर कुटुंबातील 'या' सौंदर्यवतीला भेटण्यासाठी न्यायाधीशांनी थेट समन्स पाठवले; ती कोर्टात आली अन्...

 

याबद्दल विज्ञान काय सांगते? 

केसांवर केलेल्या अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की शेव्हिंग केल्याने केसांच्या वाढीवर कोणताही परिणाम होत नाही.अमेरिकन ऍकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या मते, केसांचे शेव्हिंग केले जाते तेव्हा ते पुन्हा त्याचपद्धतीने वाढतात. याचा अर्थ शेव्हिंग केल्याने केसांची जाडी आणि घनता तसेच त्यांच्या वाढीच्या दरावर परिणाम होत नाही.

हे ही वाचा: Malvani Masala Recipe: घरच्या घरी बनवा 'अस्सल' मालवणी मसाला, जाणून घ्या सोपी रेसिपी

 

यामागे आहे मानसिक कारण 

शेव्हिंग केल्यानंतर त्वचा स्वच्छ होते आणि काही दिवसांनी त्यावर छोटे केस उगवायला लागतात. हे केस जेव्हा उगवता तेव्हा ते जाड दिसू लागतात. यामागे मानसिक कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणजेच, लोकांना फक्त असे वाटते की केस जाड येत आहेत. परंतु प्रत्यक्षात असे काहीही घडत नाही. केस पूर्वीसारखेच दाट किंवा पातळ राहतात. याशिवाय, ते पूर्वीपेक्षा जास्त दाट नाहीत किंवा ते वेगाने वाढू शकत नाहीत. त्यामुळे आजपासून जर तुम्हाला कोणी सांगितले की शेव्हिंगकेल्याने तुमचे केस दाट आणि कडक होतील, तर तुम्ही त्यांना हे वैज्ञानिकदृष्ट्या असे होत नाही हे सांगू शकता. 

हे ही वाचा: मुंबईच्या जवळच आहे मिनी थायलंड! दिवसातून फक्त 30 मिनिटेच उघडते; तुम्ही बघितले का?

 

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)