इन्स्टाग्रामवर शिक्षिकेच्या बिकीनी लूकचीच हवा... थेट महाविद्यालयापर्यंत पोहोचली बातमी आणि....

शिक्षिकेने आपले बिकिनीतील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते

Updated: Aug 10, 2022, 03:39 PM IST
इन्स्टाग्रामवर शिक्षिकेच्या बिकीनी लूकचीच हवा... थेट महाविद्यालयापर्यंत पोहोचली बातमी आणि....  title=

दिल्ली : सध्या लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सर्वांनाच सोशल मीडियाने ( वेड लावलं आहे. फेसबुक(Facebook), इन्स्टाग्राम (Instagram) सारख्या सोशल मीडियावर आता हातात मोबाईल असणाऱ्या प्रत्येकाचेच अकाऊंट आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रत्येकजण आयुष्यातील काही ना काही खाजगी गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. असाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) उघडकीस आला आहे.

एका महिला प्राध्यापिकेने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. कोलकाता येथील सेंट झेवियर्स युनिव्हर्सिटीमधल्या (Kolkata University) प्राध्यापिकेने बिकिनी घातलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

सोशल मीडियावर अश्लील छायाचित्रे पोस्ट केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी महिला प्राध्यापिकेवर केला होता. आता त्या महिला प्राध्यापिकेला विद्यापीठ प्रशासनाने 99 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा तापले आहे.

कोलकात्याच्या सेंट झेवियर्स युनिव्हर्सिटीच्या एका प्राध्यापिकेने इन्स्टाग्रामवर बिकिनीमध्ये (Bikini Pics) स्वत:चा फोटो पोस्ट केल्यानंतर तिला राजीनामा देण्यास आणि 99 कोटी दंड भरण्यास सांगण्यात आले आहे.

महिला प्राध्यपिकेने कॉलेज प्रशासनावर जबरदस्तीने राजीनामा देण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, एका विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर कॉलेज प्रशासनाने हा दबाव आणला आहे. मात्र हे प्रकरण गेल्या वर्षी ऑक्टोबरमधील असल्याची माहिती समोर आली आहे.

या बदनामीच्या नोटिशीच्या विरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे या प्राध्यापिकेने म्हटले आहे. त्याच वेळी, या प्रकरणी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरणासाठी बोलावल्यानंतर प्राध्यापिकिने सांगितले होते की, विद्यापीठात रुजू होण्याच्या दोन महिन्यांपूर्वीइंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो कोणत्याही परिस्थितीत त्यांचा कोणताही विद्यार्थी पाहू शकत नाही. कारण तोपर्यंत नंतर फोटो आपोआप ट्रॅशमध्ये जातात.

माध्यमांच्या वृत्तानुसार, महिला प्राध्यापिकेने सांगितले होते की, पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी यासंदर्भात पत्र लिहीले होते. त्यांनी पत्रात म्हटले होते की, मुलाला त्यांनी महिला प्राध्यापिकेचे अश्लिल फोटो पाहताना पकडले होते. या पत्रानंतर कॉलेज प्रशासनाने  त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे.

दरम्यान,या प्रकरणी महाविद्यालयाने 99 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावल्याने हे प्रकरण चांगलंच तापलं आहे