देवेंद्र फडणवीसांमुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दूर गेली? विनोद तावडेंनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं

Vinod Tawde On Maharashtra CM Chair: एकनाथ शिंदे आले त्यानंतर सरकार भक्कम होण्यासाठी आम्हाला अजित पवारांची मदत झाल्याचे विनोद तावडे म्हणाले.

Pravin Dabholkar | Updated: Nov 14, 2024, 07:34 PM IST
देवेंद्र फडणवीसांमुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दूर गेली? विनोद तावडेंनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं title=
विनोद तावडे

Vinod Tawde On Maharashtra CM Chair: भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील बदललेलं राजकारण, मुख्यमंत्री पद, केंद्रातील जबाबदारी अशा विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी फडणवीसांमुळे मुख्यमंत्री पदाची खुर्ची दूर गेली का? या प्रश्नावरही उत्तर दिले.  विचारसरणीमुळे उद्धव ठाकरे वेगळे झाले मग कोणत्या विचारसरणीमुळे अजित पवार एकत्र आले? असा प्रश्न तावडेंना विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना, 'एकनाथ शिंदे आले त्यानंतर सरकार भक्कम होण्यासाठी आम्हाला अजित पवारांची मदत झाली. यानंतर आमचं स्थिर सरकार झाल्याचे', तावडे म्हणाले. 

महाराष्ट्राचा बिहार व्हायला कोण जबाबदार? 

महाराष्ट्रात फोडाफोडीच राजकारण झालं. महाराष्ट्राचा बिहार होऊ लागलाय, याला कोण जबाबदार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. उद्धव ठाकरेंनी जनमताचा अनादर केला.  तिथे खऱ्या फुटीला सुरुवात झाली. महाराष्ट्रात प्रगल्भ राजकारण होत नाही. यासाठी महायुतीचं भक्कम सरकार हवंय. याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे तावडे म्हणाले. 2014 ला आम्ही ठाकरेंशिवाय लढलो होतो. मनसेने आम्हाला लोकसभेला बिनशर्थ पाठींबा दिला. महायुतीत 3 पक्ष आहेत. त्यात मनसेला फक्त 2-4 जागा देऊन चालले नसते. मनसे मोठा पक्ष आहे. पण त्यांचे विचार महायुतीच्या बाजुनेच आहेत, असे तावडे म्हणाले. पुढचा मुख्यमंत्री कोण असावा? हे आम्ही निवडणूक निकालानंतर केंद्रीय नेतृत्वासोबत फडणवीस, शिंदे आणि पवार बसून ठरवणार आहोत. निवडणुका महायुती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ठरेल. 

फडणवीसांमुळे मुख्यमंत्री पदाची खुर्ची दूर गेली?

विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस हे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. फडणवीसांमुळे तुमची मुख्यमंत्री पदाची खुर्ची दूर गेली असं वाटतं का? असा प्रश्न तावडेना विचारण्यात आला. आमच्याबद्दल अशा चर्चा होत असतात. पण मला केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली. फक्त बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही. त्यावेळी मला तुला हरयाणाऐवजी बिहारची कामगिरी बघायची आहे. तिथे पक्षाला जास्त गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे माझ्याकडे महत्वाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. 

भाजपने संधी दिली तर मुख्यमंत्री पद घ्यायला आवडेल का? 

विनोद तावडेंना महाराष्ट्रात महत्वाचे पद मिळणार अशी प्रत्येक निवडणुकीत चर्चा असते. त्यावर बोलताना तावडे म्हणाले,'एखाद्या व्यक्तीविषयी अनेकांच्या मनात प्रेम असतं. त्या प्रेमापोटी ते बोलत असतात. पण माझी चर्चा होत असेल तर ते काम शंभर टक्के होणार नाही, अशा मिश्किल शब्दात त्यांनी उत्तर दिले.  ही विधानसभा लढणार का? असं मला पक्षाकडून विचारण्यात आलं पण मी नाही सांगितलं. मी 20 वर्षे आमदार होतो. 9 खात्यांचा मंत्री होतो. पक्षाने एवढ दिलंय. आता राज्य पातळीवर पक्षाला जे हवंय ते करायचं, असे तावडे म्हणाले. भाजपचे भावी राष्ट्रीय अध्यक्ष समोर बसले आहेत, असं म्हणायच का? या प्रश्नावर उत्तर देताना 'अशी चर्चा होत असेल तर ते नक्की नाही होणार' असे उत्तर त्यांनी दिले.