Actress Kajol : बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि आमिर खान हे इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांना दोघांसोबत काम करायला आवडते. पण एक वेळ अशी होती की काजोलने आमिर खानसोबत एका चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाच्या आधी दोघांनी एकत्र काम केलं होतं. चित्रपटाला नकार दिल्यानंतर देखील दोघांनी इतर चित्रपटात एकत्र काम केलं. काजोलने आमिर खानसोबत ज्या चित्रपटाला नकार दिला होता तो चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता.
अभिनेत्री काजोलने आमिर खानसोबत पहिल्यांदा 1997 मध्ये 'इश्क'चित्रपटामध्ये काम केलं होतं. ते कधीच एकमेकांच्या विरुद्ध नव्हते. या रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटात काजोल, अजय देवगन, आमिर खान आणि जुही चावला देखील होते.
या चित्रपटाला काजोलने दिला होता नकार
एका जुन्या संभाषणात 'मेला' चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी त्यावेळी अभिनेत्री काजोलने आमिर खानसोबत काम करण्यास का नकार दिला होता याबाबत मोठा खुलासा केला आहे. काजोलला 'मेला' चित्रपटात काम करायचे होते. मात्र, तिचे काही प्रश्न होते. त्यावेळी तिला आमिर खानबद्दल खात्री नव्हती. पण नंतर तिने आमिर खानसोबत 'फना' हा चित्रपट केला. ती एक टेक वाली अभिनेत्री आहे आणि आमिर खान परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी अनेक वेळा टेक घेतात. त्यामुळे तिच्या मनात काही शंका होत्या. ती माझ्या घरी आली आणि तिने मला समजावून सांगितलं. काजोल अशा गोष्टी करण्यासाठी ओळखली जात नव्हती. नंतर या चित्रपटात आमिर खानसोबत ट्विंकल खन्नाला कास्ट करण्यात आले होते.
'मेला' हा चित्रपट 17 जानेवारी 2000 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी तो पूर्णपणे नाकारला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रचंड फ्लॉप ठरला होता. या चित्रपटात काम न करण्याचा काजोलचा निर्णय तिच्या कारकिर्दीसाठी योग्य ठरला. काजोल आणि आमिर खानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं म्हटलं तर 'इश्क' चित्रपटानंतर त्यांनी 2006 मध्ये 'फना' चित्रपटात काम केलं. हा चित्रपट हिट झाला.