Gold Silver Price Today: आज पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. वायदे बाजारात सोन्याचा भाव जवळपास 471 रुपयांच्या तेजीसह 85,9552 रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीदेखील 246 रुपयांच्या तेजीसह 95,748 रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात घडामोडी असतानाच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. अखिल भारतीय सराफा संघाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 99.9 टक्के शुद्धतेचे सोने 88,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर, 99.5 टक्के शुद्धतेचे सोनंदेखील 340 रुपयांनी घसरून 87,560 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते. आज गुरुवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे.
सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 380 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 87,050 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 79,800 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 320 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 65,290 रुपयांवर पोहोचलं आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 79,800 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 87,050 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 65,290रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,980 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,705 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6,529 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 63,840 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 69,640 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 52,232 रुपये
22 कॅरेट- 79,800 रुपये
24 कॅरेट- 87,050 रुपये
18 कॅरेट- 65,290रुपये