Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेसचं पारड जड असल्याचं सांगण्यात आलं होत. मुख्यमंत्रीपदासाठीही काँग्रेसची फॉम्युला ठरला आहे.     

Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारणार असं म्हणायला हरकत नाही. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉम्युला काँग्रेसकडून तयार करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

13 May 2023, 11:05 वाजता

Karnataka Election 2023 : निवडणूक आयोगाच्या कलानुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत

13 May 2023, 11:05 वाजता

Karnataka Election 2023 : निवडणूक आयोगानुसार काँग्रेसला 117 जांगावर आघाडी

13 May 2023, 11:01 वाजता

Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये आम्ही मोठ्या संख्येने जिंकत आहोत - सचिन पायलट

13 May 2023, 10:54 वाजता

Karnataka Election 2023 : काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक होणार आहे

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक होणार आहे. सर्व आमदार आज संध्याकाळी उशिरा बेंगळुरूला पोहोचतील. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल बेंगळुरूमध्ये उपस्थित आहेत.

13 May 2023, 10:46 वाजता

Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतं.

13 May 2023, 10:42 वाजता

Karnataka Election 2023 : काँग्रेस 115, भाजप 73, जेडीएस 29 जागांवर आघाडीवर 

13 May 2023, 10:37 वाजता

Election Result 2023 : निवडणूक आयोगानुसार काँग्रेसला 115 जागा

13 May 2023, 10:35 वाजता

Election Result 2023 : आयोगानुसार काँग्रेसला 112 जांगावर आघाडी

13 May 2023, 10:32 वाजता

कर्नाटकात जे घडत आहे तेच 2024 मध्ये होणार - संजय राऊत
कर्नाटकात काँग्रेस जिंकत असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव आहे, असे उद्धव गटाचे नेते संजय राऊत म्हणाले. त्यांचा पराभव पाहून त्यांनी बजरंग बळीला उमेदवारी दिली पण त्यांची गदा भाजपवर पडली. कर्नाटकात जे घडत आहे तेच 2024 मध्ये होणार आहे.

13 May 2023, 10:30 वाजता

कर्नाटकाबरोबरच उत्तर प्रदेशातील निवडणुकांचे निकाल

यूपी नगराध्यक्षांच्या 199 जागांपैकी भाजप 97 जागांवर आघाडीवर आहे. सपा 41 आणि बसपा 19 जागांवर आघाडीवर आहे, याशिवाय अपक्ष 37 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे.