एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. विवाहित प्रेयसीला भेटायला तिचा बॉयफ्रेंड रात्रीचा अंधारात सासरी पोहोचला. पण त्याच्या एका चुकीमुळे एकच गोंधळ झाला. हे प्रकरण उत्तर प्रदेशातल्या बदायूँमधील आहे. विवाहित गर्लफ्रेंडला भेटायला सासरी गेला अन् चुकून तो रात्रीच्या अंधारात भलत्याच बेडवर गेला आणि तो पकडल्या गेला. तो प्रेयसीऐवजी तिच्या जावेच्या बेडवर गेला. अंधारात प्रेयसी समजून तो रोमान्स करायला लागला पण ती जाऊ घाबरली आणि तिने आरडाओरडा सुरु केला. तिच्या आवाज ऐकून सासरचे सर्व मंडळी झोपेतून जागे झाले.
त्यानंतर त्याला घरच्यांनी पडलं भरपूर मारहाण केली त्यानंतर तो तिथून फरार झाला. त्यानंतर सहा दिवसांनंतर या घरात भूकंप झाला. झालं असं की, बॉयफ्रेंड पुन्हा सहा दिवसांनी विवाहित गर्लफ्रेंडला भेटायला सासरी आला आणि तिला घेऊन पळून गेला. यानंतर सासरच्या मंडळीने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. एवढंच नाही तर पोलिसांनावर निष्काळजीपणाचा आरोपही या लोकांनी केला. (extra marital affair viral news older daughter in law s boyfriend came home then younger daughter in law in bed in night)
सासरच्या मंडळीने पोलिसांना सांगितलं की, एका तरुणाचे आमच्या थोरल्या सुनेशी गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंध सुरु आहे. मोठ्या सुनेला भेटायला तो कायम घरी येत असेल. एकदा आम्ही त्याला पकडलं अन् मारहाण केली केली त्यानंतर पोलिसात तक्रारही केली. पण पोलिसांनी कारवाई केली नाही, असं ते म्हणाले. 5 नोव्हेंबरच्या रात्री सुमारे दीड वाजता थोरल्या सुनेचा प्रियकर तिला भेटण्यासाठी गच्चीवरुन शिरला. पण तो अंधारात आमच्या धाकट्या सुनेच्या बेडवर जाऊन झोपला आणि अश्लील चाळे करु लागला. तिने आरडाओरडा केला आणि त्यानंतर आम्हाला जाग आली. त्यानंतर तो तरुण घरातून पळून गेला.
त्यावेळी मारहाणीमध्ये आमच्या मोठ्या मुलाला त्या तरुणाने मारण्याचा प्रयत्न केला असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं. तेव्हा मुलानेही पोलिसांना तक्रार नोंदवली होती. पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही. तर त्यांनी विनयभंगाचा किरकोळ गुन्हाची नोंद केली बस...पण त्यानंत 6 दिवसांनी प्रियकर आला आणि मोठ्या सुनेला घेऊन पळून गेला.
मोठ्या सुनेच्या नवऱ्याने आरोप केलाय की, पोलिसांना तक्रार करुनही त्यांनी तरुणावर कडक कारवाई केली नाही. पोलिसांना सांगितलं होतं की, शुक्रवारी तरुणाने पिकअपने धडक देऊन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांना सांगूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर आता त्याने माझ्या पत्नीला घरातून पळून नेलं आहे.
दरम्यान या घटनेनंतर पोलीस स्टेशनचे प्रमुख राजेश कौशिश यांनी सांगितलं की, 'तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद करून तपास सुरू केलाय आहे. कुटुंबाने सांगितल्या प्रमाणे इतर कोणतीही तक्रार त्यांनी केली नाही. तरीदेखील सखोल तपास करत आहेत. शिवाय आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत.