March Bank Holiday : मार्च महिन्यात बँका 9 दिवस बंद राहणार ; आताच करून घ्या कामांचं नियोजन

Bank Holiday in March : मार्च महिन्यात या दिवशी बँका पूर्णपणे बंद राहतील कोणतीही महत्वाची काम असतील तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या.  

Updated: Feb 27, 2023, 06:19 PM IST
March Bank Holiday : मार्च महिन्यात बँका 9 दिवस बंद राहणार ; आताच करून घ्या कामांचं नियोजन  title=

Bank Holiday in March : आर्थिक वर्षाच्या अखेरचा महिना म्हणजे मार्च. मार्चमध्ये बँकांसंबंधी अनेक कामांची घाई असते. त्यामुळे मार्च महिन्यात बँक बंद राहतात. यावर्षी मार्च महिन्यात बँक केव्हा बंद असतील आणि बँक हॉलिडे केव्हा आहेत ते एकदा जाणून घेऊया. 

यावर्षी मार्च महिन्यात हाेळी, गुढीपाडवा आणि रामनवमी, हे मोठे सण  आले आहेत. त्यामुळे जवळपास 12 दिवस बँक बंद असणार आहेत.  (March Bank Holiday : Bank Will be Closed 9 Days in March Know List here)

अधिक वाचा: Aadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक...नाहीतर ३१ मार्चनंतर...

संपूर्ण देशभरात या सुट्ट्या लागू असतील. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) नुकतेच एक परिपत्रक जरी केलं आहे. त्या परिपत्रकात मार्च महिन्यात बँक कोणत्या दिवशी बंद असतील त्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.   
यात सांगितल्याप्रमाणे राज्य आणि स्थानिक सण या नुसार सुट्ट्या बदलू शकतात. 

 

  • 5 मार्च      रविवार (साप्ताहिक सुट्टी )
  • 7 मार्च      धुळवड 
  • 11 मार्च     दुसरा शनिवार
  • 12  मार्च     रविवार  (साप्ताहिक सुट्टी )
  • 19 मार्च     रविवार (साप्ताहिक सुट्टी )
  • 22 मार्च     गुढीपाडवा
  • 25 मार्च     चाैथा शनिवार
  • 26  मार्च     रविवार (साप्ताहिक सुट्टी )
  • 30 मार्च     रामनवमी

आरबीआयच्या (RBI) परिपत्रकानुसार वर दिलेली यादी आहे त्यानुसार बँक बंद असतील, बँकांची कुठलीही काम त्यादिवशी होणार नाहीत. त्यामुळे बँकांशी निगडित काहीही काम असतील तर ती या तारखांच्या आतच करून घ्या. नाहीतर मोठा गोंधळ होईल.  (March Bank Holiday : Bank Will be Closed 9 Days in March Know List here) मात्र खातेधारक नेट बँकिंग किंवा ऑनलाईन बँकिंग  सुविधांचा वापर करू शकतात.