नवी दिल्ली : मोदी सरकार पुन्हा मोठी योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना(PMJJBY), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) आदी सोशल स्किम केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. आता नैसर्गिक आपत्तीमुळे घरांच्या होणाऱ्या नुकसानीला विमा सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार होम इंश्युरन्स स्किमद्वारे (home insurance scheme) घराला विमा सुरक्षा कवर देणार आहे. नैसर्गिक आपत्ती जसे की, भूकंप, महापूरच्यावेळी लोकांचे घराचे नुकसान झाल्यास 3 लाख रुपयांचा विमा सुरक्षा देण्यात येईल.
केंद्र सरकार ही योजना जनरल इंश्युरन्स कंपन्यांच्यामाध्यमातून राबवू शकते. त्याचा प्रीमियम लोकांच्या बँक अकाऊंटशी लिंक असेल. होम इंश्युरन्स स्किमसाठी साधारण 500 रुपये वार्षिक प्रीमियम असू शकतो.
भूकंप, मुसळधार पाऊस, महापूर, भूस्खलन इत्यांदीमुळे घरांच्या होणाऱ्या नुकासानीला विमा सुरक्षा देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात येणार आहे.