'हो मी माझ्या पत्नीला फसवलं,' प्रसिद्ध अभिनेत्याने दिली जाहीर कबुली, म्हणाला 'मी एक-दोनदा...'

Amit Tandon Cheated On His Wife Multiple Times : अमित टंडननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या पत्नीला अनेकदा धोका दिल्याचा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 12, 2024, 04:37 PM IST
'हो मी माझ्या पत्नीला फसवलं,' प्रसिद्ध अभिनेत्याने दिली जाहीर कबुली, म्हणाला 'मी एक-दोनदा...' title=
(Photo Credit : Social Media)

Amit Tandon Cheated On His Wife Multiple Times : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेत दिसलेला अभिनेता अमित टंडन गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. या सगळ्यात त्यानं एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यानं पत्नी रुबीला अनेकदा धोका दिल्याचे स्वीकारले आणि सांगितलं की कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या नात्यावर परिणाम झाला. 

अमित टंडननं ही मुलाखत सिद्धार्थ कननला दिली. या मुलाखतीत अमितनं त्याच्या खासगी आयुष्यातील चढ-उतारांविषयी सांगितलं. त्याला विचारलं की त्यानं कधी आयुष्यात कोणाला धोका दिला आहे का? तर त्यावर उत्तर देत अमित म्हणाला, 'हो, मी धोका दिलाय. आता मी काय सांगू. हो असे काही क्षण होते, जिथे मी विचार करायचो की सन्मानानं कसं सांगू, पण ते सांगण्यासाठी कोणताही सन्मानपूर्वक पद्धत नाही. माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्यावर मी नियंत्रण ठेवू शकलो नाही. त्यावेळी मी माझ्या भूतकाळातील काही गोष्टींना पुढे येऊ दिलं. हे स्पष्ट आहे की काही काळ तर तिला काही माहितही नव्हतं. पण अखेर जेव्हा तिला सगळं कळलं, त्यानंतर सगळं काही पूर्णपणे बदललं.'

त्यानं पुढे सांगितलं की या सगळ्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि कधी-कधी तो दुरावा कधी भरून निघत नाही. हे फक्त वाढत राहतं. अगदी जलद गतीनं सगळं वाढतं. आमचं एक मुलं होतं वाटायचं की आणखी एक बाळ झालं तर सगळं काही ठीक होईल. पण असं झालं नाही. अमितनं 2007 मध्ये रुबीशी लग्न केलं आणि 2017 मध्ये दोघं विभक्त झाले. त्यानंतर 2019 मध्ये दोघांनी एकमेकांची समजूत काढली. 

दरम्यान, अमित टंडननं अभिनेत्री मौनी रॉयवर आरोप केला होता की तिनं त्याची पत्नी रूबीचा वापर केला. मौनीवर निशाणासाधत त्यानं म्हटलं की दाक्षिणात्य अभिनेता 410 कोटींचा मालक मात्र त्याचा मुलगा स्पेनमध्ये करतोय शेती! आई म्हणाली, 'त्याचा काही...'जेव्हा त्याची पत्नी रुबी टंडन ही संकटात होती तेव्हा मौनी रॉयनं तिला सोडलं. त्यानं हे देखील सांगितलं की तो मौनी रॉयला कधी माफ करणार नाही आणि नाही कधी तिचा चेहरा पाहणार. 

हेही वाचा : दाक्षिणात्य अभिनेता 410 कोटींचा मालक मात्र त्याचा मुलगा स्पेनमध्ये करतोय शेती! आई म्हणाली, 'त्याचा काही...'

अमित टंडननं 2005 मध्ये 'कैसा ये प्यार है' च्या सुरुवातीला आणि नंतर 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'साथ निभाना साथिया' सारख्या मालिकांमध्ये अभिनय साकारत लोकप्रियता मिळवली. तर तो सगळ्यात शेवटी 'कसम तेरे प्यार की' या मालिकेत दिसला होता.