मुंबई : आयएमडी जीएफएस मॉडेल मार्गदर्शनानुसार मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर १०-११ ऑगस्टपासून मान्सून सक्रिय होणार आहे. सुमारे आठवडाभर अशी स्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडी जीएफएस मॉडेल मार्गदर्शनानुसार मुंबईसह १०-११ ऑगस्टपासून पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय होणार आहे. सुमारे आठवडाभर ह्या स्थितीची शक्यता
As per IMD GFS model guidance, monsoon likely to be active on west coast from 10-11 Aug including Mumbai.Likely to cont for a week... pic.twitter.com/CK4UKSJskR— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 8, 2020
गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईसह राज्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या २ दिवसांपासून पावसाने पुरती विश्रांती घेतली असल्यामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे. नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.