Most Expensive Dog In India: भारतामधील सर्वात महागडा कुत्रा! दिवसाचा खर्च सामान्यांच्या Per Day Salary पेक्षाही जास्त

Dog In Bengaluru: या कुत्र्याच्या मालकाला कुत्रे पाळण्याचा छंद आहे. त्याने कोट्यावधी रुपये खर्च करुन हा दुर्मिळ कुत्रा खरेदी केला. कोकेशियन शेफर्ड प्रजातीचा हा कुत्रा आहे. मागील काही दिवसांपासून हा कुत्रा चर्चेचा विषय ठरत आहे. या कुत्र्याची वैशिष्ट्येही त्याच्या किंमतीइतकीच खास आहेत.

Updated: Jan 30, 2023, 08:53 PM IST
Most Expensive Dog In India: भारतामधील सर्वात महागडा कुत्रा! दिवसाचा खर्च सामान्यांच्या Per Day Salary पेक्षाही जास्त title=
caucasian shepherd india

Caucasian Shepherd Dog Of 20 Crore: केवळ भारतातच नाही तर जगभराध्ये पाळीव प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती लोक पाळतात. अगदी कुत्र्या, मांजरींपासून ते कासवांपर्यंत अनेक प्राण्यांचा या पाळीव प्राण्यांमध्ये समावेश होतो. अशाचप्रकारे बंगळुरुमधील एका व्यक्तीने खरेदी केलेल्या पाळीव कुत्र्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या व्यक्तीने तब्बल 20 कोटी रुपये (Dog Of 20 Crore) खर्च करुन हा कुत्रा विकत घेतला आहे. या कुत्र्याची लाइफस्टाइलच एवढी आलीशान आहे की त्याची देखरेख करण्यासाठी रोज हजारो रुपये खर्च होतात. एखाद्या सामान्य व्यक्तीचा दैनंदिन पगार नसेल एवढा या कुत्र्याचा दिवसाचा खर्च असल्याचंही सांगितलं जात आहे.

कोण आहे या कुत्र्याचा मालक?

बंगळुरुमध्ये राहणाऱ्या आणि 20 कोटींचा कुत्रा खरेदी करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे सतीश. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या कुत्राचं नाव सतीशने कॅडबॉम हैदर असं ठेवलं आहे. हा कुत्रा दीड वर्षांचा आहे. सतीश एक डॉग ब्रीडर आहे. याच माध्यमातून तो कमाई करतो. त्याने हैदराबादमधील एका ब्रीडरकडून कोकेशियन (Caucasian Shepherd) प्रजातीचा हा दुर्मिळ कुत्रा विकत घेतला होता.

एका उद्योजकाने दिलेली ऑफर

या कुत्र्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या कुत्र्याने आतापर्यंत अनेक डॉग शोमध्ये सहभाग घेतला आहे. या कुत्र्याने अनेक स्पर्धाही जिंकल्या आहेत. हा कुत्रा ज्या ज्या डॉग शोमध्ये हजेरी लावतो त्याला पाहण्यासाठी त्याच्याभोवती बघ्यांची गर्दी जमा होते. हैदराबादमधील एका उद्योजकाने या कुत्र्याला अशाच एका डॉग शोमध्ये पाहिल्यानंतर सतीशला 20 कोटी रुपयांना हा कुत्रा विकत घेण्याची ऑफर दिली होती. मात्र सतीशने ही ऑफर फेटाळून लावली.

एका दिवसाचा खर्च...

अन्य एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार सतीश या कुत्र्यावर रोज दोन ते तीन हजार रुपये खर्च करतो. या कुत्र्याला एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी एसी गाडीची व्यवस्था सतीशने केली आहे. म्हणजेच या कुत्र्याची देखभाल करण्यासाठी सतीश महिन्याला अंदाजे एक लाख रुपये खर्च करतात. या कुत्र्याची किंमत आणि त्याच्या देखभालीचा खर्च पाहता हा भारतामधील सर्वात महागडा कुत्रा (Most Expensive In India) असल्याचं सांगितलं जातं. हा कुत्रा माणसाळलेला आहे. कोकेशियन प्रजातीचे कुत्र हे फार बुद्धिमान असतात. सुरक्षेच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचे असतात असंही प्राणीप्रेमी सांगतात.