मुंबई : आई.... आई म्हणजे या जगात निस्वार्थी मिळणारे प्रेम. आई म्हणजे आपल्या लेकरांची आणि कुटूंबाची कोणताही शब्द न काढता काळजी घेणारी व्यक्ती. आई म्हणजे संपूर्ण घराला बांधून ठेवणारी आणि घराला घरपणं देणारी व्यक्ती. लोकांच्या तिच्या प्रती वेगवगळ्या भावना आहेत. आपली आई जर एक दिवस घरी नसेल तर, आपल्या घराची आणि आपल्या रोजच्या जीवनाची घडी विस्कटलीच म्हणून समजा. परंतू आपल्यापैकी किती जणांनी याचा विचार केला आहे?
आईला कितीही त्रास झाला, तरी ती त्याबद्दल कधीही तक्रार करत नाही. ती नेहमी आपल्या लेकारांसाठी आणि कुटुंबीयांसाठी खंबीर असते. आपण जरा जास्त काम केलं तरी आपण थकतो किंवा आपल्याला कामाचा कंटाळा येतो.
परंतु आई कधीच थकत नसेल का? तिला कंटाळा येत नसेल का? एवढी ताकद आणि शक्ती ती आणते कुठून? तरं त्यामगचं कारण आहे आईचं काळीज. जे आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार होते. याचा पुरावा देणारा एक फोटो सध्या सोशल मीडिया माध्यमातून व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये ऑक्सिजन लावून एक महिला आपल्या स्वयंपाकघरात काम करताना दिसत आहे. यामध्ये ही महिला पोळ्या करताना तुम्ही पाहू शकता. हा एक फोटो इतका बोलका आहे की, बाकी काहीच बोलण्याची गरज नाही. एखाद्या आईचं तिच्या मुलासाठी आणि एखाद्या गृहिणीचं आपल्या कुटुंबासाठीचं प्रेम इथे काहीही न बोलता सिद्धं होते.
हा फोटो सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला आहे आणि लोकां त्याला वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काहींनी आईच्या प्रेमा बद्दल आपले मतं व्यक्त केलं आहे. तर काहींनी ही सामाजीक रचनेमधील गुलामी असल्याचे म्हंटले आहे. तर काही जणांनी घरं, मुलं, कुटुंब आणि करिअर अशा सगळ्या पातळीवर मेहनत करणाऱ्या आणि कधीही सुट्टी न घेणाऱ्या आई, महिला, बहिणीचे कौतुक केले आहे.
या फोटोवर गयिका चिन्नमयी श्रीपदानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने महिलांना आराम न करण्यास भाग पाडणाऱ्या निस्वार्थी प्रेमाचे सत्र कधी थांबू शकतं का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान काही यूझर्स या फोटोची सत्यता पडताळण्यासाठी कमेंट केले आहेआणि त्या फोटोची सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
I am raising funds for families affected by Covid-19 wherein the breadwinner has been affected. You’ll donate directly to the family. Many are unable to pay fees as well.
I ll be sending you a song video in return.— Chinmayi Sripaada (@Chinmayi) May 7, 2021