भोपाळ : भारतीय समाजामध्ये अजूनही तृतीय पंथीयांकडे फारसे चांगल्या दृष्टीने पाहिले जात नाही.
तुच्छतेने वागवल्या जाणार्या तृतीय पंथीयांसाठी मध्य प्रदेशामध्ये अश्वासक गोष्ट घडली आहे. भोपाळ येथील मंगलवारा हागात पालिकेने केवळ तृतीयपंथीयांसाठी स्वच्छतागृह उभारले आहे.
पालिकेने उभारलेल्या या स्वच्छता गृहामध्ये इतरांना प्रवेश नाही. तसेच इतरांनी वापर केल्यास त्यांच्यांवर कडक कारवाईचा इशाराही दिला आहे.
Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan inaugurated public toilets for transgender community in Bhopal pic.twitter.com/XUIFAVkE0S
— ANI (@ANI) October 2, 2017
स्वच्छ भारत अभियाला तीन वर्ष झाली आहेत. या मोहिमेतील तृतीयपंथीयांसाठी उभारलेले स्वच्छतागृह हे फार महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. तृतीयपंथीयांच्या स्वच्छतागृहांबाबत तक्रारी सोडवण्यासाठी खास पंचायत उभारली जाणार आहे. तसेच लवकरच त्यांच्या घरांसाठी प्रकल्प उभारले जातील याबद्दलची माहिती मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिली आहे.