Nagaland Election Results 2023: ईशान्येकडील तिन्ही राज्यांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असताना नागालँडमध्ये भाजपाची मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. सुरुवातीच्या कलांनुसार राज्यात भाजपा सत्तेत येण्याची शक्यता आहे. नागालँडमध्ये भाजपा आणि नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी (NDPP) यांची युती आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपा आणि एनडीपीपी युती 60 पैकी 39 जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता आहे.
नागालँडमध्ये नागा पिपल्स फ्रंट (NPF) पाच जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान नागालँडमध्ये भाजपाने एनडीपीपीशी युती केली असली तर छोट्या भावाच्या भूमिकेत आहेत. जागावाटपानुसार भाजपा 60 पैकी फक्त 20 जागांवर लढत आहे. तर उर्वरित 40 जागांवर एनडीपीपीचे उमेदवार उभे होते.
#NagalandAssemblyElections2023 | Nationalist Democratic Progressive Party leading on 11 seats, BJP won one seat and leading on 3 seats
Janata Dal (United), Lok Janshakti Party(Ram Vilas)Nationalist Congress Party & Republican Party of India (Athawale) leading on one seat each pic.twitter.com/wtAfPGYMel
— ANI (@ANI) March 2, 2023
मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीपी 2018 पासून भाजपासह युतीत आहे. 2018 च्या निवडणुकांपासून दोन्ही पक्ष युती करत आहेत. मागील निवडणुकीत युतीने 30 जागा जिंकल्या होत्या तर NPF ने 26 जागा जिंकल्या होत्या. 2003 पर्यंत राज्यात सत्ता असणाऱ्या काँग्रेसचा एकही सदस्य सभागृहात निवडून आलेला नव्हता. तर एनपीएफने 23 पैकी 22 जागा लढल्या होत्या.
59 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान झालं असून एक जागा भाजपा उमेदवाराने बिनविरोध जिंकली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नागालँडमध्ये एकही महिला उमेदवार नाही. 1963 मध्ये राज्याची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत 14 वेळा विधानसभा निवडणूक पार पडली असून आतापर्यंत एकही महिला प्रतिनिधी निवडून आलेली नाही. सध्याच्या निवडणुकीत 183 मध्ये चार महिला उमेदवार आहेत.