बंगळुरु : कर्नाटक विधानसभेत एचडी कुमारस्वामी सरकारच्या भवितव्य काही वेळेतच स्पष्ट होणार आहे. १६ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारपुढे बहुमत सिद्ध करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. दोन्ही बाजुच्या आमदारांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. फ्लोर टेस्टमध्ये कोणाची बाजु किती मजबूत आहे यावर एक नजर टाकूया.
- जर एचडी कुमारस्वामी सरकारकडे बहुमत नसेल तर ते विधानसभेत भाषणानंतर राजीनामा देतील.
- जर सरकारकजे बहुमताचा आकडा असेल तर सभागृहात यावर चर्चा होईल. त्यानंतर विश्वास दर्शक ठराव मांडण्यात येईल.
- सरकारला जर बहुमत सिद्ध करता आलं नाही तर मुख्यमंत्री राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवतील.
- काँग्रेस-जेडीएसला आशा आहे की, भाजपचे काही आमदार सभागृहात उपस्थित नाही राहणार ज्यामुळे सरकार वाचेल.
सुप्रीम कोर्टाने बुधवारी बंडखोर आमदारांना दिलासा दिला होता. बंडखोर आमदारांवर पक्षाद्वारे व्हिप लागू करता येणार नाही असा आदेश कोर्टाने दिला होता. त्यामुळे बंडखोर आमदार हे सभागृहात अनुपस्थित राहू शकतात.
बंडखोर आमदार रामलिंगा रेड्डी यांनी बुधवारी संध्याकाळी सरकारच्या बाजुने मतदान करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
भाजप १०५
अपक्ष ०२
काँग्रेस ७८ + १ स्पीकर
जेडीएस ३७
बसपा ०१
नॉमिनेटेड ०१
भाजप १०५
अपक्ष ०२
जेडीएस ३४
काँग्रेस ६५
बसपा ०१
नॉमिनेटेड ०१
कुमारस्वामी सरकारकडे सध्या काँग्रेस-जेडीएस मिळून १०० ते १०१ आमदार आहेत. जर भाजपकडे स्वबळावर १०५ आमदार आहेत.