मुंबई : यंदा मान्सूनचं आगमन लांबणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. पावसाच्या आगमनाच्या आणि परतीच्या सुधारित तारखांचा अहवाल आज प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यात केरळात पाऊस ४-५ दिवस उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
केरळवर यावर्षी नैऋत्य मॉन्सूनची सुरुवात चार दिवस उशिरा होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) शुक्रवारी व्यक्त केली. मान्सूनच्या सुरुवातीच्या तारखेनंतर चार दिवसांनी जूनपर्यंत दक्षिणेकडील राज्यात प्रवेश करण्याची जास्त शक्यता आहे.
BreakingNews । यावर्षी मान्सूनचा पाऊस केरळमध्ये लांबण्याची शक्यता, एक जूनऐवजी ५ जूनला केरळमध्ये येण्याचा हवामान विभागाचा अंदाज#Monsoon #Rain
@ashish_jadhao pic.twitter.com/dBQQETlL07— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 15, 2020
यावर्षी केरळवर नैऋत्य मॉन्सूनची सुरुवात सुरू होण्याच्या सामान्य तारखेच्या तुलनेत थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये यावर्षी मान्सूनची सुरुवात जून रोजी सर्वसाधारण होण्याची शक्यता असते, असे आयएमडीकडून सांगण्यात आले. दरम्यान, केरळात मान्सून चार दिवसांनी उशिराने दाखल होईल, असा अंदाज आहे.
केरळमध्ये मान्सून सुरु झाल्याने देशात चार महिन्यांच्या पावसाळ्याची अधिकृत सुरुवात होते. बंगालच्या उपसागरात वादळाच्या चक्रीय स्थितीवर मॉन्सून स्थिती असते. साधारण १६ मेपर्यंत आधी मान्सून अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात पोहोचण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने (आयएमडी) बुधवारी सांगितले.