आता घरबसल्या करता येईल PAN Card वरील बदल; जाणून घ्या सोपी प्रोसेस

PAN Card |  सर्व आयकरदात्यांना पॅन कार्ड आवश्यक आहे. हे असे दस्तऐवज आहे जे आर्थिक व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावते.

Updated: May 31, 2022, 02:02 PM IST
आता घरबसल्या करता येईल PAN Card वरील बदल; जाणून घ्या सोपी प्रोसेस title=

मुंबई : सर्व आयकरदात्यांना पॅन कार्ड आवश्यक आहे. हे असे दस्तऐवज आहे जे आर्थिक व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावते. डिजिटल व्यवहार असोत, बँक खाते उघडणे असो, कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे असो, याची प्रत्येकाला गरज असते. याशिवाय बँक खाते, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमध्ये जास्तीची रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.

पॅन कार्डमध्ये 10-अंकी परमनंट अकाउंट नंबर (PANअसतो. ते अल्फा न्यूमेरिक नंबरमध्ये आहे. ते प्राप्तिकर विभागाकडून जारी करण्यात येते. सर्व पॅनकार्डचे रेकॉर्ड प्राप्तीकर विभागाकडे असतात.

घरबसल्या बदला फोटो

  • जर तुमचे पॅनकार्ड खूप जुने झाले असेल किंवा त्यात तुमचा जुना फोटो असेल किंवा तुमचा फोटो खराब असेल तर आता तुम्ही ते घरी बसून बदलू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो ऑनलाइन बदलू शकता.
  • पॅन कार्डवरील तुमचा फोटो बदलण्यासाठी, सर्वप्रथम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • वेबसाइटवर, तुम्हाला ऑनलाइन अर्ज करा आणि नोंदणीकृत वापरकर्ता असे दोन पर्याय दाखवले जातील.
  • Apply Online वर क्लिक केल्यानंतर विद्यमान पॅनकार्ड बदलण्याचा पर्याय निवडावा लागेल.
  • यासाठी Correction in existing PAN’ या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर ज्या श्रेणीमध्ये वैयक्तिक पर्याय निवडायचा आहे ती श्रेणी निवडा.
  • यानंतर स्क्रीनवर विचारलेली माहिती भरा आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.
  • आता तुम्हाला KYC पर्याय निवडावा लागेल.
  • ते निवडल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर फोटो आणि स्वाक्षरी जुळणारे दोन पर्याय दिसतील. तुम्हाला फोटो बदलायचा असेल तर फोटो आणि सही बदलायची असेल तर सहीसह पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमच्याकडून विचारले जाणारे तपशील भरा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर, तुमचा आयडी प्रूफ, फोटो आणि इतर कागदपत्रे विचारली जातील ज्यासाठी सॉफ्ट कॉपी संलग्न करावी लागेल.
  • यानंतर घोषणापत्रावर टिक करा आणि फॉर्म सबमिट करा.
  • या फॉर्मची प्रिंट आउट घेण्यास विसरू नका कारण आयकर पॅन सेवा युनिटला एक प्रत पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि काही दिवसांनी पॅन कार्डमधील फोटो बदलला जाईल.