Petrol Price Today : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल महागले की स्वस्त झाले? चेक करा लेटेस्ट दर

Petrol Diesel Price on 6th April 2023 : गेल्या महिन्याभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोल स्वस्त आहे तर काही शहरांमध्ये पेट्रोल महागले आहे. चेक करा आजचे लेटेस्ट दर.... 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 6, 2023, 08:07 AM IST
Petrol Price Today : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल महागले की स्वस्त झाले? चेक करा लेटेस्ट दर title=
Petrol And Diesel Price Today 6 April 2023

Petrol Diesel Rate : गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती कमी झाल्या असून ब्रेंट क्रूडच्या किमतीत किरकोळ घट झाली आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Rate) किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहेत. आज एनसीआरमधील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे किरकोळ दर बदलले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे तेल उत्पादक देशांचा समूह असलेल्या OPEC ने मे 2023 पासून तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

आज (6 April 2023) कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी नरमाई दिसून येत आहे. WTI कच्च्या तेलाच्या किमतीत 0.21 टक्क्यांनी घट झाली असून सध्या ते प्रति बॅरल $ 80.44 वर व्यापार करत आहे. तर दुसरीकडे ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमती 0.20 टक्क्यांनी घसरत आहेत आणि ते प्रति बॅरल $ 84.82 वर व्यापार करत आहेत. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात बदल झाला आहे. परिणामी काही शहरात पेट्रोल महागले तर काही शहरात पेट्रोल स्वस्त झाले आहे. 

वाचा: बजरंगबलीची 'या' राशींवर असेल विशेष कृपा, बिघडलेली कामं होतील यशस्वी 

या शहरात पेट्रोल महाग

दिल्लीजवळील नोएडा एनसीआर भागात पेट्रोल 27 पैशांनी तर डिझेल 26 पैशांनी महागले असून ते 96.65 रुपये आणि 89.82 रुपये प्रति लिटर महागले आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोल 41 पैसे स्वस्त आणि डिझेल 40 पैसे प्रति लिटर 96.77 रुपये आणि 89.65 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. दुसरीकडे, राजस्थानच्या जयपूरमध्ये आज पेट्रोल 108.62 रुपये आणि 93.85 रुपये प्रति लीटर 6 पैशांनी आणि डिझेल 5 पैशांनी महागले आहे. दुसरीकडे, यूपीची राजधानी लखनऊमध्ये आज पेट्रोल 11 पैसे स्वस्त आणि डिझेल 11 पैसे प्रति लीटर 96.57 रुपये आणि 89.76 रुपये स्वस्त आहे.

  • दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.