नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त वाराणसीमध्ये आज मोदींच्या जाहीर सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदींच्या वाढदिवसाचं निमित्त साधत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या सभेचं आयोजन केलं आहे. यावेळी मोदी 200 शाळकरी मुलांसोबत वाढदिवस साजरा करणार आहेत. मुलं त्यांना कविता आणि गोष्टी ऐकवणार आहेत. संध्याकाळी मुलांसोबत पंतप्रधान मोदी 'चलो जीते हैं' नावाचा चित्रपट पाहणार आहेत. मोदींचा आजचा मुक्कामही काशीमध्येच असणार आहे.
आज पंतप्रधान मोदी जवळपास 600 कोटींच्या कामांचा शुभारंभ करणार आहेत. चार वर्षात पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या मतदारसंघात ही 14 वी भेट आहे. मागच्या भेटीमध्ये पंतप्रधान मोदींनी काशीला विकास कामांची भेट दिली होती. प्रोटोकॉलनुसार पंतप्रधान मोदी 19 तास काशीमध्ये असणार आहेत. ते सोमवारी संध्याकाळी पाच वाजता बाबतपूर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर वायुदलाच्या विमानाने ते डिरेका येथे जातील. त्यानंतर ते प्राथमिक विद्यालयालातील मुलांना भेटतील. दूसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 9.30 वाजता ते एम्फीथिएटर मैदानावर सभा घेतील. तेथेच ते वैदिक विज्ञान केंद्र, अटल इन्क्यूबेशन सेंटर, रिजनल इंस्टीट्यूट ऑफ ऑफ्थेल्मोलॉजी, चोलापूरमध्ये 132 केवीए उपकेंद्र आणि वीज आणि पाणी प्रकल्पाचं भूमीपूजन करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी सोमवारी गोरखपूर तुरुंगातून पाच कैद्यांची सूटका होणार आहे. संपूर्ण राज्यातून 68 कैद्यांची सूटका केली जाणार आहे.