मुंबई : PFIवर NIAनं कारवाई केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आलीय. पंतप्रधान मोदींची (Pm Narendra Modi) 12 जुलैची पाटण्यातील रॅली (Patna rally) पीएफआयच्या निशाण्यावर होती अशी धक्कादायक कबुली आरोपी शफीफ पैठने (Shafif Paith) दिलीय. रॅलीवेळी वातावरण बिघडवण्याचा कट होता, यासाठी काही पोस्टर बनवले होते अशी माहिती आरोपीनं दिलीय. (pm narendra modi patna rally was on target of pfi big disclosure in nia inquiry)
NIAनं पीएफआयवर कारवाई केल्यानंतर चौकशीतून एक धक्कादायक माहिती समोर आलीय. PFIच्या निशाण्यावर दुसरं तिसरं कुणी नव्हतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाटण्यातील रॅली होती. केरळमधून ताब्यात घेण्यात आलेला PFIचा कार्यकर्ता शफीक पेठच्या चौकशीतून हा गौप्यस्फोट झालाय. पाटण्यातील पंतप्रधान मोदींच्या रॅलीवेळी वातावरण बिघडवण्याचा कट होता. यासाठी काही पोस्टर्स बनवण्यात आले होते अशी माहितीही आरोपीनं दिलीय. इतकच नाही तर देशविरोधी कारवायांसाठी PFIच्या खात्यात एका वर्षात तब्बल 120 कोटी रूपये जमा झाल्याची माहितीही उघड झालीय.
सूत्रांच्या माहितीनुसार, 12 जुलैला पाटण्यात झालेल्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीत वातावरण बिघडवण्याचा कट PFIनं आखला होता. यासाठी PFIनं कार्यकर्त्यांना ट्रेनिंगही दिलं होतं. देशविरोधी कारवाया, तरूणांना ट्रेनिंग देण्यासाठी PFIच्या खात्यात 120 कोटी रूपये जमा करण्यात आले. जितका पैसा खात्यात जमा झाला त्याच्या दुप्पट रोख रक्कमही जमा करण्यात आली. आता हा पैसा नेमका कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार होता याचा शोध तपास यंत्रणा घेतायेत.
NIA आणि ईडीनं केलेल्या कारवाईत आतापर्यंत देशभरातून 106 जणांना अटक करण्यात आलीय. आता तपासयंत्रणांच्या चौकशीतून PFIविषयी आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते हेच पाहावं लागेल.