Post Office Scheme: पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीकडे सर्वात सुरक्षित गुंतवणूक पाहिलं जातं. त्यामुळे भविष्याचा विचार करता पोस्टातील गुंतवणुकीसाठी (Post Office Investment) प्राधान्य दिलं जातं. पोस्टात गुंतणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. यात मंथली इनकम स्किम (Monthly Income Scheme) आणि रिकरिंग डिपॉजिट (Recuring Deposite) यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जाते. मंथली इनकम स्किम म्हणजेच एमआयएसमध्ये एकरकमी पैसे भरून महिन्याला व्याज मिळतं. तर आरडीमध्ये दर महिन्याला गुंतवणूक केली जाते आणि मॅच्युरिटीवेळी व्याजासह रक्कम मिळते. त्यामुळे या गुंतवणुकीतील सर्वात उत्तम पर्याय कोणता ठरेल जाणून घ्या.
Monthly Income Scheme (एमआयएस): या योजनेंतर्गत एकरकमी गुंतवणूक करावी लागते. पाच वर्षांसाठी गुंतवणूक करून दर महिन्याला व्याजाच्या रुपात ठराविक रक्कम मिळते. एक व्यक्ती 4.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. जॉइंट अकाउंटमध्ये 9 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. दीडच्या पटीने गुंतवणूक करता येते. या रक्कमेवर 6.7 टक्के व्याज मिळतो. उदा. जर तुम्ही 4.5 लाख रुपये गुंतवणूक केली तर महिना 2513 रुपये मिळतील. 9 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5025 रुपये महिना मिळतील. वार्षिक 60300 रुपये मिळतात.
Recurring Deposite (आरडी): पोस्टात दर महिन्याला ठरवलेली निश्चित रक्कम टाकावी लागते. गुंतवणूक 100 रुपयांनी सुरु करू शकता. पोस्ट ऑफिस आरडीवर 5.5 टक्के वार्षिक व्याज देते. आरडीची गणना प्रत्येक तिमाहीवर असते आणि कंपाउंडिंग इंटरेस्टचा फायदा होतो. न चुकता तुम्ही 12 हफ्ते भरल्यास 50 टक्क्यांपर्यंत लोन घेऊ शकता. जर एखादी व्यक्ती दर महिन्याला 7500 रुपये जमा करत असेल तर 5.8 टक्क्यानुसार मॅच्युरिटीवर 72,725 रुपये फायदा होईल. व्यक्ती 5 वर्षात एकूण 4,50,000 रुपये गुंतवणूक करेल आमि मॅच्युरिटीवेळी 5,22,725 रुपये मिळतील.
जॉब बदलल्याने एकापेक्षा जास्त EPF अकाउंट झालेत! मर्ज करा नाही तर...
आता वरचं गणित तुम्ही समजून घेतलं असेल. त्यामुळे तुम्ही तुमची गुंतवणूक करू शकता. तुम्ही एमआयएसमध्ये गुंतवणूक करून तुम्ही दर महिन्याला निश्चित रक्कम घेऊ शकता. आरडीचा पर्यायही निवडू शकता. तसं पाहिलं तर हल्ली एसआयपी हा देखील गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. पण तुम्ही योग्य तो पर्याय निवडू शकता.