मुंबई : राकेश झुनझुनवाला हे स्टॉक मार्केटमधील एक अनुभवी गुंतवणूकदार आणि मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जातात. ते मुंबईत 14 मजली इमारतीत राहतात. बिगबुलच्या घराला पॅलेस म्हणतात कारण त्यात सर्व सुखसोयी आहेत. राकेश झुनझुनवाला यांच्या घराची तुलना आता अंबानी कुटुंबियांच्या अँटिलियाशी केली जात आहे. झुनझुनवाला यांचे घर अँटिलियापेक्षाही सुंदर असल्याचे सांगितले जात आहे. ही 14 मजली इमारत राकेश आणि त्यांच्या पत्नीने दोनदा खरेदी केली होती. रिपोर्टनुसार, राकेश झुनझुनवाला यांनी यापूर्वी 2013 मध्ये याचे सात मजले विकत घेतले होते. त्यानंतर 2019 मध्ये उर्वरित सात मजलेदेखील त्यांनी विकत घेतले.
स्टॉक मार्केटमधील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या घराच्या 14व्या मजल्यावर एक आलिशान स्विमिंग पूल, पिझ्झा काउंटर, व्हेजी गार्डन, आउट डोअर टेरेस, रीहीटिंग किचन आहे. 8व्या मजल्यावर मसाज रूम, बाथरूम आहे. या महालात कोणत्याही सुविधांची कमतरता नाही.
राकेश झुनझुनवाला यांच्या या इमारतीत 10व्या मजल्यावर कुटुंबाचा वेळ घालवण्यासाठी जागा आहे. या विशेष ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. दुहेरी उंचीची बाल्कनी, पूजा कक्ष, स्वयंपाकघर आणि दिवाणखाना आहे. रिपोर्टनुसार, या इमारतीत तळमजल्यावर फुटबॉल कोर्टही आहे.
या सुंदर घराच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर स्टोरेज आणि बेडरूमचं कॉम्बिनेशन ठेवण्यात आलं आहे. चौथ्या मजल्यावर पाहुण्यांसाठी व्यवस्था आहे आणि 11व्या मजल्यावर मुलांची बेडरूम आहेत. पाहुण्यांच्या खोलीचे सौंदर्यही पाहण्यासारखे आहे.
राकेश आणि त्यांच्या पत्नीची बेडरूम या पॅलेसच्या 12व्या मजल्यावर आहे. यात ड्रेसिंग रूम, लिव्हिंग एरिया, वेगळे बाथरूम, बाल्कनी, पॅन्ट्री आणि सलून आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. शेअर मार्केटमध्ये वेगळी ओळख असलेल्या राकेशच्या घराची छायाचित्रे म्हणजे एखाद्या महालासारखी आहेत.