'त्याला तर मी उद्या.... ' रोहितमुळे हुकली अक्षरची हॅट्रिक, मग पुढे जे विधान केलं ते महत्त्वाचं...

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात अक्षर पटेलची हॅट्रिक हुकली. अक्षरने हॅट्रिक घेतली असती पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक अतिशय सोपी कॅच सोडली. आता अक्षर पटेलने रोहितच्या ड्रॉप कॅचवर मोठे विधान केले आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 21, 2025, 11:54 AM IST
'त्याला तर मी उद्या.... ' रोहितमुळे हुकली अक्षरची हॅट्रिक, मग पुढे जे विधान केलं ते महत्त्वाचं...

Champions Trophy : भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडियाने ४६.३ षटकांत ४ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. या सामन्यात एके ठिकाणी असे वाटत होते की बांगलादेशचा संघ १०० धावांपूर्वीच बाद होईल. पण कर्णधार रोहित शर्माने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये एक साधा झेल सोडला, ज्यामुळे बांगलादेशला चांगली धावसंख्या गाठता आली नाही तर अक्षर पटेल हॅट्रिकही हुकला. आता अक्षरने रोहितबद्दल मोठे विधान केले आहे.

रोहित शर्माने सोडली मॅच 

बांगलादेशच्या डावाच्या 9 व्या षटकात अक्षर पटेलने सलग 2 चेंडूंवर 2 बळी घेतले. तिसऱ्या चेंडूवर अक्षर पटेलची विकेट हुकली कारण कर्णधार रोहित शर्माने स्लिपमध्ये कॅच सोडला आणि त्याची हॅट्रिक हुकली. कॅच चुकवल्याने रोहित इतका निराश झाला की तो रागाने जमिनीवर आदळू लागला. यानंतर तो अक्षर पटेलची माफी मागतानाही दिसला. रोहित शर्माने जाकर अलीचा झेल सोडला.

अक्षरने रोहितबद्दल काय म्हटले?

केएल राहुलच्या हुशारीमुळे अक्षरलाही आणखी एक विकेट मिळाली. केएल राहुलच्या अपीलवर, टीम इंडियाला विकेट मिळाली. यावर अक्षर म्हणाला, 'खूप काही घडले. तो बाद झाला की नाही हे मला माहित नव्हते पण केएलने अपील केले आणि तो बाद झाला. मग मला दुसरी विकेट मिळाली. मला वाटलं होतं की, मी हॅटट्रिक घेतली. मी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आणि मग तिसरी कॅच रोहित शर्माकडून सुटली.

रोहितने कॅच सोडल्याबद्दल अक्षर म्हणाला, 'मी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आणि परत आलो. कारण कॅच सुटणे हा एकखेळाचा एक भाग आहे. विकेटवर फलंदाजी करणे सोपे झाले आहे आणि मला वाटते की, लक्ष्यांचा पाठलाग करणे सोपे झाले आहे. ही एक संथ खेळपट्टी आहे आणि चेंडू जसजसा जुना होत जातो तसतसा त्यावर फलंदाजी करणे सोपे होते. दुसऱ्या डावातही तो मंद राहील. जेव्हा जेव्हा माझ्या संघाला गरज असेल तेव्हा योगदान देणे ही माझी भूमिका आहे. संघाला माझ्यावर इतका विश्वास आहे याचा मला आनंद आहे.

टीम इंडियाचा मोठा विजय

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना बांगलादेशशी झाला. यासह भारतीय संघाला २ गुण मिळाले. टीम इंडिया आता पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ थोडा चांगला धावगतीसह गट अ मध्ये अव्वल स्थानावर आहे.