Gov Jobs | 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारमध्ये तब्बल 38 हजार पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज

भारतीय पोस्ट विभागाने देशभरात 38926 पदांसाठी भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. पोस्टाच्या सर्व 35 मंडलांमध्ये BRANCH POSTMASTER (BPM), ASSISTANT BRANCH POSTMASTER (ABP), DAK SEVAK पदांसाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे.

Updated: May 24, 2022, 08:03 AM IST
Gov Jobs | 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारमध्ये तब्बल 38 हजार पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज title=

मुंबई : भारतीय पोस्ट विभागाने देशभरात 38926 पदांसाठी भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. पोस्टाच्या सर्व 35 मंडलांमध्ये BRANCH POSTMASTER (BPM), ASSISTANT BRANCH POSTMASTER (ABP), DAK SEVAK पदांसाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे.

भारतीय पोस्टमध्ये ब्रँच पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर, डाक सेवक पदांसाठी अर्ज करण्यासाठी https://indiapostgdsonline.cept.gov.in/Post_Consolidation.aspx या लिंक वर क्लिक करावे. 

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार इंग्रजी आणि गणित विषयांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 40 वर्षे असावे. आपल्या कॅटगरीनुसार वयोमर्यादेची सूट देण्यात आली आहे. 

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 5 जून ही शेवटची तारीख आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातदेखील साधारण 3000 हजार पदे भरण्यात येणार आहे.

पदांच्या अधिक माहितीसाठी https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Model_Notification.pdf या लिंकवर क्लिक करावे.