सगळीकडे Coldplay ची चर्चा आहे. त्याचं तिकिट मिळवणं हे शिखर चढण्यासारखं दिव्य होतं. असं असताना एक व्यक्ती Coldplay साठी मुंबईहून थेट अहमदाबादला गेला. पण तिकिट मात्र घरीच विसरला. सध्या या प्रकरणाची आणि या तरुणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
शनिवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्लेने त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेयर्स कॉन्सर्ट'चा भाग म्हणून शो केला. चाहत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खूप गर्दी केली होती. ज्यामध्ये एक व्यक्ती मुंबईहून अहमदाबादला बहुप्रतिक्षित कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवास करत होता पण तिथे पोहोचल्यानंतर लगेचच त्याला लक्षात आले की तो त्याचे तिकीट घरी विसरलो आहे.
Friend sat in train to Ahmedabad from Mumbai for Coldplay concert and forgot concert tickets at home
— hxrshl (@whyisitunreal) January 25, 2025
ही घटना X वर शेअर करण्यात आली आणि लवकरच त्याचे लक्ष वेधले गेले. युझर्सने त्याच्या मित्राचा अनुभव सांगताना म्हटले, "मित्र कोल्डप्ले कॉन्सर्टसाठी मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसला होता आणि कॉन्सर्टची तिकिटे घरी विसरला."
या प्रकरणाने हजारो लोकांचं लक्ष वेधलं आहे. यावर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहे. ब्रो.. कोल्डप्लेला जाण्यासाठी खूप उत्सुक होता. पण घाई गडबडीत तिकीट घरीच विसरला. दुसरा म्हणाला, स्विगी करुन ऑर्डर कर... या ट्विटवर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर यावर खूप चर्चा झाल्यानंतर आणखी एक ट्विट व्हायरल होऊ लागलं. या ट्विटमध्ये कॉन्सर्ट सुरु होण्यापूर्वीच तरुणाला आपलं तिकिट कुरिअरच्या माध्यमातून मिळालं.
Update : pic.twitter.com/JHUHF7Ruc5
— hxrshl (@whyisitunreal) January 26, 2025
दरम्यान, कोल्डप्लेने 25 जानेवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा कॉन्सर्ट आयोजित केला होता. ज्याला 100000 हून अधिक चाहते या प्रतिष्ठित ठिकाणी आकर्षित झाले होते. बँडने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर या कार्यक्रमाचा एक फोटो शेअर करत आपला उत्साह व्यक्त केला आणि म्हटले की, “आमचा आतापर्यंतचा सर्वात मोठा कॉन्सर्ट. अगदी मनाला भिडणारा. अहमदाबाद, उद्या पुन्हा भेटूया – आणि जर तुम्ही भारतात असाल, तर कृपया संध्याकाळी 7.45 वाजता डिस्ने+ हॉटस्टारवर आमच्यात सामील व्हा.” त्यांच्या कॉन्सर्टपूर्वी, कोल्डप्लेने एक हलकीफुलकी पोस्ट शेअर केली ज्यामध्ये एका खराब काढलेल्या क्रिकेट बॉलचा समावेश होता, ज्यामध्ये भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहचा खेळकरपणे उल्लेख होता.