CoWin वर रशियाच्या Sputnik V व्हॅक्सीनसाठी नोंदणी सुरु, इतकी आहे किंमत

रशियाची स्पुतनिक व्ही लसीसाठी नोंदणी सुरु झाली आहे. 

Updated: May 18, 2021, 02:39 PM IST
CoWin वर रशियाच्या Sputnik V व्हॅक्सीनसाठी नोंदणी सुरु, इतकी आहे किंमत title=

मुंबई : भारतात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात आता आणखी एक व्हॅक्सीन भारतात आली आहे. रशियाची व्हॅक्सीन स्पुतनिक-वी (Sputnik-V) आता बुकींगसाठी कोविन (CoWin) अॅपवर उपलब्ध झाली आहे. याआधी 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना कोवॅक्सीन आणि कोविशील्ड लस दिली जात आहे.

अपोलो हॉस्पिटलसोबत करार

स्पुतनिक-व्गी (Sputnik-V) व्हॅक्सीनसाठी डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr. Reddy's Laboratories) ने अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospital) सोबत करार केला आहे. स्पुतनिक व्हीची लस हैदराबादच्या जुबली हिल्समधील अपोलो रुग्णालयात दिली जात आहे. यानंतर विशाखापट्टनम, दिल्ली, मुंबई, बंगळुरु, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुण्यात देखील रशियाची ही व्हॅक्सीन उपल्बध होणार आहे.

एका डोसची किंमत 1250 रुपये

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospital) मध्ये स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) चा एका डोससाठी 1250 रुपये मोजावे लागणार आहे. ज्यामध्ये रुग्णालयाचे चार्जेस देखील समाविष्ट आहेत. डॉ रेड्डीज लॅबोरेटरीजने माहिती दिली होती की, स्पुतनिक व्हीची किंमत 948 रुपये आहे. ज्यावर 5 टक्के जीएसटी लागत आहे. ज्यामुळे वॅक्सीनची किंमत 995.4 रुपये होते. यामध्ये हॉस्पिटलचे चार्जेस जोडून त्याच्या एका डोसची किंमत 1250 रुपये आहे.

1 मे रोजी भारतात पहिला खेप

रशियाची स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) वॅक्सीनची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली होती. यानंतर डॉ. रेड्डीज लॅबने वॅक्सीनची किंमत जाहीर केली. 13 मेला सेंट्रल ड्रग्स रेगुलेटरी याला मंजुरी दिली.

देशात 24 तासात 4329 जणांचा मृत्यू 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 63 हजार 533 लोकांना कोरोनाचा लागण झाली आहे. तर 4329 जणांनी आपला जीव गमवला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी मृत्यूची संख्या आहे. भारतात आतापर्यंत 2 कोटी 52 लाख 28 हजार 996 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2 लाख 78 हजार 719 लोकांचा मृत्यू झाला आहे.