Crime News In Marathi: इंदौरच्या बाणगंगा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने लग्नाच्या पहिल्या रात्री झालेल्या कौमार्य चाचणीविरोधात कोर्टात दाद मागितली आहे. तरुणीचा आरोप आहे की, लग्नानंतर तिच्या सासरच्या मंडळीने कौमार्य चाचणीसाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला. ज्यामुळं तिला शारिरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. या प्रकरणात इंदौर जिल्हा न्यायालयाने सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने समाजातील कुप्रथांविरोधात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.
पीडित तरुणीचे लग्न डिसेंबर 2019 रोजी भोपाळ येथे राहणाऱ्या एका युवकासोबत झाले होते. लग्नानंतर तिचा एकदा गर्भपात झाला होता तसंच, एक बाळ जन्मताच मृत पावलं होतं. आता तिला एक मुलगी आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर महिला व बाल विकास विभागाच्या तपासात खुलासा झाला की, लग्नानंतर पीडितेच्या सासरच्या मंडळींनी कौमार्य चाचणी करण्यासाठी अमानवी पद्धती वापरल्या. तसंच, पीडितेला हुंड्यासाठीही तिच्यावर अत्याचार केले.
पीडित महिलेने म्हटलं आहे की, गेल्या 5 वर्षांपासून ती सासरच्या लोकांचा अत्याचार सहन करत आहे. सासू आणि पतीने तिच्या चारित्र्यावरही संशय घेतला होता. महिलेने मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा डीएनए चाचणी करण्याचा दबाव सासरच्या मंडळींनी तिच्यावर टाकला होता. तसंच, वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा हवा, असे टोमणेदेखील सासू सूनेला दररोज मारत होती. या रोजच्या त्रासाला वैतागून पीडिता सासरी निघून आली होती.
सासरच्या मंडळीने पीडिताकडे दोन लाख रुपयांचा हुंडादेखील मागितला होता. तसंच, छोट्या छोट्या गोष्टीवरुन ते तिचा छळ करत होते. पीडितेला एकदा दिवस गेले होते मात्र पती, सासू, सासरे यांच्यासोबतच्या सततच्या वाद विवादामुळं आणि तणावातून तिचा गर्भपात झाला. त्यानंतर काही दिवसांने पुन्हा एकदा दिला दिवस राहिले. मात्र तिची सासू आणि पती कोणीही तिला डॉक्टरकडेदेखील नेलं नाही.
कोर्टाने या प्रकरणी महिला अत्याचाराचे हे प्रकरणी गंभीर असून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणानंतर महिलांचे अधिकारांचा अभाव आणि अशा कुप्रथा अजूनही पाळण्यात येतात, हे वास्तव समोर आलं आहे.