मुंबई : शेअर बाजार सध्या अस्तिरतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग तेजी दिसून येत असली तरी, बाजारात नक्की कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम असतो. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी एक्सपर्टच्या सल्ल्याने चांगले फंडामेंटल असलेले शेअर सुचवत आहोत. टाटा ग्रुप चा टायटन चा शेअर येत्या वर्षभरात चांगला परतावा देण्याच्या तयारी आहे. असे मोतिलाल ओसवाल या ब्रोकरेज हाऊसकडून सांगण्यात आले आहे. आपल्या गुंतवणूकदारांना त्यांनी या शेअरमध्ये एका वर्षासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
Titan: 2,950 रुपयांचे लक्ष्य
मोतिलाल ओसवाल यांच्या संशोधन टीमने टायटनच्या शेअरवर 'बाय' चा सल्ला दिला आहे. एका वर्षासाठी 2950 रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गुंतवणूकदारांना सध्याच्या शेअर किंमतीवरून साधारण 328 रुपये किंवा 12 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.
मागील वर्षभरात हा शेअर साधारण 71 टक्क्यांनी वधारला आहे. टाटा समुहाचा हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. मागील पाच वर्षात या शेअरने 630 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे
राकेश झुनझुनवाला यांचा फेवरेट स्टॉक
शेअर मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्यासाठी टायटनचा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे. . सप्टेंबर 2021 च्या तिमाही अहवालानुसार झुनझुनवाला यांची टायटनमध्ये होल्डिंग 4.9 टक्के इतकी आहे.