तेलंगणा : तेलंगणामध्ये पुजाऱ्यांशी विवाह करणाऱ्या महिलांना तीन लाख रुपये दिले जाणार आहेत. तशी घोषणाच तेलंगणा ब्राह्मण कल्याण संघटनेनं केलीय.
आर्थिक तंगीच्या कारणामुळे पुजाऱ्यांना विवाहासाठी मुली मिळणं दुरापास्त होऊन बसलंय, असं तेलंगणाच्या ब्राह्मण कल्याण संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळेच अशा तरुण ब्राह्मणांना विवाहासाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आलीय.
पुजाऱ्यांचं अस्तित्व असेपर्यंतच मंदिर आणि संस्कृती अविरत राहील... गरीब ब्राह्मणांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासोबतच संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी या निर्णयाची आवश्यकता आहे, असं महा ब्राह्मण संघमचं म्हणणं आहे.
उल्लेखनीय म्हणजे तेलंगणा सरकारनं आपल्या २०१६ च्या बजेटमध्ये ब्राह्मणांच्या कल्याणासाठी १०० करोड रुपयांची तरतूद केलीय.
परंतु, एखाद्याचा विवाह ही राज्याची जबाबदारी कशी असू शकते? जर कुणी एकटं राहत असेल तर ही सरकारची समस्या आहे का? विवाह पैशांशिवाय केले जाऊ शकत नाहीत का? असे अनेक प्रश्न या निर्णयाचा विरोध करणाऱ्यांनी उपस्थित केलेत.