श्रीनगर : झज्जर कोटलीमध्ये सुरक्षारक्षकांवर दहशतवादी हल्ल्यानंतर वैष्णों देवीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. सुरक्षारक्षकांना दहशतवाद्यांच्या ठिकाणाची कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही. काल हल्ल्यानंतर दहशतवाही फरार झाले होते. उधमपूरमध्ये रस्त्यावर नाकांबदी करण्यात आली आहे. शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्टेशनवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
#WATCH: Gunshots heard in Jammu's Kakriyal as security personnel conduct a search operation for terrorists in the area. (Visuals deferred by unspecified time) #JammuAndKashmir pic.twitter.com/lqi5nKxKuh
— ANI (@ANI) September 13, 2018
उधमपूरमधील लष्कराचं मुख्यालय आणि नगरोटा येथील लष्कराचं मुख्यालय या 2 ठिकाणी देखील दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. हा संपूर्ण भाग लष्करी छावणीचा आहे. येथे मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात आहेत. कटडामध्ये हजारो श्रद्धाळू येतात. कटडा यूनिवर्सिटी आणि रुग्णालयात हजारों स्टूडेंट्स आणि स्टाफ आहे. यांची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय बनला आहे.
बुधवारी सकाळी 8:30 वाजता हे दहशतवादी दिसले होते. त्यानंतर त्यांचा कोणताही पुरावा हाती लागलेला नाही.