मुंबई : आपण हे अभ्यासात वाचलं आणि आणि पाहिलं देखील आहे की, रात्र झाली की आकाशात आपल्यालं चंद्र आणि तारे दिसू लागतात. सुर्यापेक्षा चंद्र आणि ताऱ्यांचा प्रकाश कमी असतो. यामुळेच आपल्याला सुर्य मावळल्यानंतर चंद्र आणि तारे आकाशात दिसू लागतात. गेल्या काही वर्षांत आकाशात तारे दिसणे बंद झाल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. तुमच्या लक्षात आले असेल. पूर्वी जिथे रात्रीचे आकाश ताऱ्यांनी भरलेले असायचे, परंतु आता असे काही होत नाही.
यामागचे कारण अनेकदा प्रदूषण मानले जाते. परंतु तुम्हाला माहित आहे का की तारे न दिसण्याचे कारण शहरांचे दिवे आहेत. प्रकाशातून पसरणाऱ्या प्रदूषणामुळे असे घडत असल्याचे अनेक शास्त्रज्ञांनी सांगितले.
शास्त्रज्ञांनी असे सांगितले आहे की, आता जगातील फक्त 20 टक्के लोक म्हणजे काही भागातूनच लोकं आकाशाला त्याच्या मूळ स्वरूपात पाहू शकतात.
यामागील कारण सांगत शास्त्रज्ञ म्हणतात, शहरांमधील वाढता कृत्रिम प्रकाश यामागे कारणीभूत आहे. प्रकाशामुळे आकाशातील अंधार संपला आहे. अहवालानुसार, आता शहरांमधील प्रकाश रात्रीच्या आकाशाच्या 40 पट आहे. तसेच प्रदुषणाचा देखील यावर परिणाम होतो.
तुमचे घर, रस्ता, परिसरात दिवे लागत आहेत. ज्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोानातुन लोकांचे प्रश्न सुटत असले, तरी याचा परिणाम निसर्गावरती होत आहे, हे लक्षात घ्या. पण सतत वाढत जाणाऱ्या प्रकाशामुळे आपल्या इको सिस्टीममध्येही मोठा फरक पडत आहे.
हे लक्षात घ्या की, याचा परिणाम पक्ष्यांपासून झाडांवर आणि वनस्पतींवर होत असल्याचे मानले जाते. तसे, आम्ही तुम्हाला सांगतो की, अंतराळात 70 हजार अब्ज तारे आहेत, ज्यामध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत.