नवी दिल्ली : 4 नोव्हेंबरला भारतीय हवाई दलात आणखी तीन राफेल लढाऊ विमानं सामील होणार आहेत. फ्रान्सहून उड्डाण केल्यावर हे तीनही राफेल विमानं न थांबता भारतात पोहोचतील. फ्रान्सचे एअरबेस ते गुजरातमधील जामनगरपर्यंत फ्रान्स एअर फोर्सचे हवेत इंधन भरणारं विमान देखील सोबत येणार आहे. फ्रान्सची कंपनी दासौ एव्हिएशनच्या पाच राफेल विमानांचा पहिला ताफा २९ जुलै रोजी भारतात आला होता. फ्रान्सहून उड्डाण झाल्यानंतर हा ताफा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) थांबला होता. भारताने फ्रान्ससोबत ५९००० कोटी रुपयाचा ३६ राफेल विमानांचा करार केला आहे.
फ्रान्समध्ये राफेलसाठी भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, राफेलसह हवाई दलाने तंत्रज्ञानातही विकास केला आहे. अत्याधुनिक शस्त्रे आणि उत्कृष्ट सेन्सरसह सुसज्ज असे हे लढाऊ विमान आहे. यातील अर्धे विमानं अंबाला एअरबेसवर आणि अर्धे विमानं पश्चिम बंगालमधील हशिमारा एअरबेसवर ठेवण्यात येणार आहे.
- जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांमध्ये राफेलचा समावेश आहे.
- हे विमान 1800 किमी प्रतितास वेगाने उडण्यास सक्षम आहे.
- राफेलच्या निश्चित लक्ष्यातून शत्रू सुटू शकत नाही. वेतन भार न घेता राफेलचे वजन 10 टन आहे. क्षेपणास्त्रासह उड्डाण केल्यास त्याचे वजन 25 टनपर्यंत जावू शकते.
- राफेल विमानातील सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र म्हणजे व्हिज्युअल रेंज एआयआर.
- राफेल विमान अत्यंत थंड वातावरणातही हिमालयात उडण्यास सक्षम आहेत. प्रत्येक लढाऊ विमानात या प्रकारची क्षमता नसते.
- राफळे विमाने स्टील्थ तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. याचा अर्थ असा की त्याच्याकडे शत्रूच्या रडारला चकवा देण्याची शक्ती आहे.
- हे विमान आता हॅमर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असेल. या क्षेपणास्त्रांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही लढाऊ विमान नो स्केप झोनमध्ये दिसल्यास हे विमानही त्यास नष्ट करू शकेल.
- राफेल एका मिनिटात 18 हजार मीटर उंचीवर जाऊ शकते. या दृष्टीने ते पाकिस्तानच्या एफ-16 किंवा चीनच्या जे-20 पेक्षा उत्तम आहे.
- या विमानात हवेतच ईंधन भरण्याची क्षमता आहे, त्यामुळे एकाच वेळी ते अधिक अंतर प्रवास करू शकतात.