Spicejet Facilities: जेव्हा आपण विमानाने प्रवास करतो हा अनुभव त्या प्रत्येक प्रवाशाला आला असणार आहे. जेव्हा आपण विमान प्रवास करुन विमानतळावर पोहोचतो, तेव्हा घरी जाण्यासाठी आपल्याला टॅक्सीची सोय करावी लागते. अनेक वेळा टॅक्सी मिळत नाही, त्यामुळे आपल्या खूप वेळ वाया जातो. पण आता स्पाइसजेट (SpiceJet) या विमान कंपनीने त्यांचा प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आणली आहे.
स्पाइसजेट विमान कंपनीने विमान प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांचा प्रवाशांसाठी टॅक्सीची सोय (Taxi Service) केली आहे. ही सेवा भारतातील मोठ्या शहरातील विमानतळांवर सुरु झाली आहे. याशिवाय दुबई विमानतळावरही ही सोय सुरु झाली आहे. (trending news spicejet will start the facility of dropping passengers from the airport to home in marathi)
घरापासून विमानतळापर्यंत (Airport from Home) आणि विमानतळापासून (Home from Airport) घरापर्यंत ही टॅक्सी सर्विस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही टॅक्सी रद्द केली तर तुम्हाला कुठलीही भरपाई द्यावी लागणार नाही. शिवाय टॅक्सीसाठी झिरो कॅन्सलेशन आणि झिरो वेटिंग टाइम ठेवण्यात आला आहे.
स्पाइसजेटची फ्लाइट बुक केल्यानंतर प्रवाशांना मोबाईलवर SMS येईल. या SMS मध्ये टॅक्सी सर्विसबद्दल माहिती असणार. या SMS मध्ये एक लिंकही पाठविण्यात येणार आहे. या लिंकमध्ये प्रवाशांना पिकअपचे ठिकाण आणि वेळ अपडेट करायचे आहे. यानंतर तुमची कॅब बुक होईल आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळेल.
1. दिल्ली
2. मुंबई
3. चेन्नई
4.हैदराबाद
5. बंगळुरू
6. कोलकाता
7. वाराणसी
8. अमृतसर
9. जयपूर
10. अहमदाबाद
11. कोची
12. पुणे
13. तिरुपती
14. डेहराडून
15. पोर्ट ब्लेअर
16. दुबई
स्पाइसजेट टॅक्सी सेवेचा लात्र घेतल्यानंतर प्रवाशांना इटपट कॅशबॅकचाही लाभ मिळणार आहे. जर तुम्ही आता स्पाइसजेट कंपनीचे विमान तिकीट बुक केलं असेल तर आता तुम्हाला कन्फर्म कॅब मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही.