हे खरंय! भारतात 'या' एका ट्रेननं फुकटात करता येतो प्रवास; कोणत्या मार्गावर 75 वर्षांपासून सुरूय ही सुविधा?

Indian Railway : रेल्वेनं प्रवास करायचा म्हटल्यावर सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे तिकीट काढण्याचं. याच रेल्वे प्रवासाविषयीची एक कमाल गोष्ट तुम्हाला माहितीये?   

सायली पाटील | Updated: Nov 26, 2024, 02:40 PM IST
हे खरंय! भारतात 'या' एका ट्रेननं फुकटात करता येतो प्रवास; कोणत्या मार्गावर 75 वर्षांपासून सुरूय ही सुविधा?  title=
Indian railway Train Which Does Not Require A Ticket you can travel for fress

Indian Railway : भारतीय रेल्वेनं आजवर असंख्य प्रवाशांना त्यांच्या अपेक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे. कोणी कामासाठी, कोणी आप्तेष्ठांना भेटण्यासाठी, कोणी भटकंतीसाठी तर, कोणी चक्क जोडीदार शोधण्यासाठी आणि व्यवसायासाठीसुद्धा या रेल्वेनं प्रवास केला आणि करत आहेत. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वे जाळं अशी ओळख असणाऱ्या याच भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही नियमांचं पालनही करावं लागतं. मग तो तिकीटाविषयीचा नियम असो किंवा प्रवासादरम्यान किती सामान न्यावं याविषयीचा. 

रेल्वे आणि रेल्वेचं तिकीट हे अतुट नातं असलं तरीही देशात एक अशी ट्रेनही आजे, जिनं चक्क मोफत प्रवास करता येतो, माहितीये? भारतामध्ये दर दिवशी 13000 हून जास्त ट्रेन धावतात, पण या गर्दीत एक अशीही रेल्वे आहे ज्या माध्यमातून प्रवाशांना अगदी मोफत प्रवास करता येतोय आणि तोसुद्धा गेल्या 75 वर्षांपासून. आश्चर्य वाटेल, पण हे खरंय. 

मोफत प्रवासाची सुविधा देणाऱ्या या ट्रेनचं नाव आहे भाकरा नांगल ट्रेन (Bhakra-Nangal train). मागील 75 वर्षांपासून साधारण 13 किमी अंतर ही रेल्वे कापते. यादरम्यान ती, नांगल, पंजाब, भाकरा आणि हिमाचल प्रदेश असा प्रवास करते. अतिशय सुरेख अशा सतलत नदीवरून आणि शिवालिग पर्वतरांगेतून ही ट्रेन पुढे जाते. प्राथमिक स्तरावर जेव्हा या ट्रेनची सुरुवात झाली तेव्हा भाकरा- नांगल धरणाच्या बांधकामासाठी मजुर आणि सामानाची ने-आण करण्यासाठी तिचा वापर होत होता. 1948 पासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत तत्पर आहे. 

1953 मध्ये या ट्रेनला अमेरिकेहून आयात करण्यात आलेलं डिझेल इंजिन जोडण्यात आलं पण या रेल्वेमध्ये असणारी आसनव्यवस्था इतिहासाची साक्ष देत कायमच कुतूहलाचा विषय ठरली. या रेल्वेनं मोफत प्रवास करु दिला जाण्यामागे काही विशेष कारणं आहेत. 

काय आहेत या मोफत प्रवासामागची कारणं? 

भाकरा बियास व्यवस्थापकीय मंडळाक़डून या रेल्वेसाठीच्या इंधनाचा खप पाहता रेल्वे तिकीट लागू करण्याचा विचार होतानाच अखेर या रेल्वेच्या परंपरेला सलाम करण्यासाठी म्हणून तिला प्रवास मोफतच सुरू ठेवण्यात आला. ही रेल्वे फक्त एक दळणवळणाचं साधन नसून, ती इतिहासात डोकावम्याची संधी देणारी एक मदतीची वस्तू आहे असंच अनेकांचं मत. 

हेसुद्धा वाचा : 88 लाख रुपये per night भाडं... जगातील सर्वात महागड्या रेल्वेत असं आहे तरी काय? 'हे' Photos एकदा पाहाच

अधिकृत आकडेवारीनुसार दर दिवशी या ट्रेननं 800 प्रवासी प्रवास करतात. स्थानिकांसाठी हे प्रवासाचं एक अतिशय सोपं माध्यम आहे. या प्रवासादरम्यान प्रवाशांना भारतातील सर्वाच उंच भाकरा- नांगल धरण, शिवालिक पर्वतरांगा पाहण्याची संधी मिळते. दर दिवशी सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी या ट्रेनचा प्रवास सुरू होऊ नांगल रेल्वे स्थानकाहून सकाळीच 8.20 मिनिटांनी भाकरा इथं पोहोचते. त्यामुळं कधी प्रवासाच्या निमित्तानं या क्षेत्रात जायची संधी मिळाली, तर या ऐतिहासिक रेल्वेचा प्रवास नक्की अनुभवा.