एक कप चहाने केलं डॉक्टर बनण्याचं स्वप्न उद्ध्वस्त, विद्यार्थिनीची हायकोर्टात धाव, वाच काय आहे प्रकरण

18 वर्षांची दिशा शर्मा नीट परीक्षा देऊन डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहात होती. 10 वी आणि 12 वीत दिशाने 100 पैकी 100 गुण मिळवले होते. पण एका चुकीमुळे या हुशार मुलीचं स्वप्न उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे  

राजीव कासले | Updated: Jun 10, 2023, 09:38 PM IST
एक कप चहाने केलं डॉक्टर बनण्याचं स्वप्न उद्ध्वस्त, विद्यार्थिनीची हायकोर्टात धाव, वाच काय आहे प्रकरण title=

Trending News : असं म्हणतात इंग्रजांनी भारतात चहा (Tea) आणला. 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांनी देश सोडला. चहाची जव प्रत्येक भारतीयच्या जीभेवर कायम राहिली. भारतात क्वचितच काही लोकं असतील ज्यांना चहा आवडत नसेल. पण याच चहाने एका मुलीच्या स्वप्नांना धक्का बसला आहे. राजस्थानमधल्या जयपूरमध्ये राहाणाऱ्या एका विद्यार्थिनीचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न एका चहामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आता या विद्यार्थिनीने हायकोर्टात धाव घेतली आहे. (Studnet Dream of becoming a Doctor Shattered)

काय आहे नेमकं प्रकरण?
जयपुरमधल्या बस्सी या ठिकाणी राहाणाऱ्या 18 वर्षांच्या दिशा शर्माने दहावी आणि बारावीत शंभरपैकी 100 गुण मिळत जिल्ह्यात नाव काढलं. लहानपणापासूनच हुशार असणाऱ्या दिशाने डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. त्यासाठी ती दिवसरात्र अभ्यासही करत होती. कुटुंबियांकडूनही तिला प्रोत्साहन मिळत होतं. दोन वर्ष अभ्यास केल्यानंतर दिशा नीट (NEET) परीक्षेसाठी सज्ज झाली. पण परीक्षेच्या दिवशी मोठा घोळ झाला आणि दिशाच्या स्वप्नांचा चक्काचुर झाला. 

पेपर सुरु असताना क्लास रुममध्ये असलेल्या परीक्षकाच्या एका चुकीमुळे दिशाला मोठी किंमत चुकवावी लागली. पेपर सुरु असताना परीक्षकाला चहा पिण्याची तलफ आली. यासाठी त्याने वर्गातच चहा मागवला. कपातून चहाचा आनंद घेत परीक्षक वर्गात निरीक्षण करत होता. पण त्याचवेळी नेमका घोळ झाला. परीक्षकाच्या हातातून चहाचा कप निसटला आणि तो नेमका दिशाच्या उत्तरपत्रिकेवर पडला. उत्तरपत्रिकेवर चहा पसरला गेला.

चहा पसरल्याने दिशाने उत्तरपत्रिकेत पेनाने लिहिलेली शाई विखुरली आणि सर्व उत्तरं पुसली गेली. उत्तर पत्रिकेचं एक पान पूर्णपणे खराब झालं. नीट एक्झाममध्ये दिशाला 470 गुण मिळाले, ज्यामुळे दिशाची एमबीबीएसची (MBBS) जागा हुकली. तिला वेटनरी, बीडीएस, बीएससी किंवा नर्सिंगला प्रवेश मिळतोय. पण एमबीबीएसचा तिचा प्रवेश काही मार्कांनी हुकला. याविरोधात दिशाने हायकोर्टात धाव घेतली आहे. 

दिशाने याचिकेत आपल्याला कमी मार्क मिळण्यामागे परीक्षकाची चुक असल्याचं सांगितलं. इतकंच नाहीतर तिला अतिरिक्त पाच मिणटांचा वेळही देण्यात आला नाही. या सर्व गोंधळात तिला 17 प्रश्नांची उत्तरं लिहिता आली नाही, जी तिला चांगल्यापैकी येत होती. या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यास तिला वेळ मिळाला असता तर दिशाला चांगले गुण मिळाले असते आणि तिला एमबीबीएसला प्रवेश घेता आला असता. 

हाटकोर्टाने हे प्रकरण गांभीर्याने घेत परीक्षा घेणाऱ्या एनटीए संस्थेला जाब विचारला आहे. हायकोर्टाने वर्गातल्या सीसीटीव्ही फुटेज मागवलं असून चार जुलैला याप्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे.