UIDAI मध्ये नोकरीची संधी, लेखी परीक्षेची गरज नाही; 1 लाख 70 हजारहून अधिक मिळतोय पगार

UIDAI Recruitment 2024:   UIDAI च्या या भरतीतून अधिकारी लेव्हलची पदे भरली जाणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 3, 2024, 02:45 PM IST
UIDAI मध्ये नोकरीची संधी, लेखी परीक्षेची गरज नाही; 1 लाख 70 हजारहून अधिक मिळतोय पगार title=
UADAI Job

UIDAI Recruitment 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया  म्हणजेच यूआयडीएआय (UIDAI) मध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. यासाठी अधिकृ वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणती लेखी परीक्षा देण्याची गरज नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 1 लाख 70 हजारहून अधिक पगार दिला जाणार आहे. UIDAI च्या या भरतीतून अधिकारी पदे भरली जाणार आहेत. यामध्ये UIDAI मध्ये उपसंचालक आणि वरिष्ठ लेखाधिकारीच्या रिक्त पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणालाही अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेली संबंधित पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार 56 वर्षेांपर्यंत असावी. यापुढे वय असलेले उमेदवार अर्ज करु शकत नाहीत. अन्यथा त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. 

किती मिळेल पगार?

उपसंचालक आणि वरिष्ठ लेखाधिकारी पदासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार पुढील वेतनश्रेणी दिली जाईल.
उपसंचालक पदासाठी पे मॅट्रिक्स लेव्हल-11 अंतर्गत दरमहा 67 हजार 700 ते 2 लाख 08 हजार 700 रुपये पगार दिला जाईल. तर वरिष्ठ लेखाधिकारीसाठी पे मॅट्रिक्स स्तर-10 अंतर्गत दरमहा 56 हजार 100 ते 1 लाख 77 हजार 500 रुपये पगार दिला जाणार आहे. 

कसा कराल अर्ज?

UIDAI भरतीसाी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जाऊन अर्ज करू करावा लागेल. इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत नोटिफिकेशनमधून अर्ज डाउनलोड करावा आणि तो योग्यरित्या भरावा. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा आणि शेवटच्या तारखेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर जमा करा.

कुठे पाठवाल अर्ज?

उमेदवारांनी आपले अर्ज संचालक (मानव संसाधन), युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, ब्लॉक-व्ही, पहिला मजला, हाउसफेड कॉम्प्लेक्स, बेलटोला-बसिष्ठ रोड, दिसपूर, गुवाहाटी - 781006 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 

अर्जाची शेवटची तारीख 

तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही 20 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकता. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा 

एसबीआयमध्ये नोकरी आणि 85 हजारपर्यंत पगार

एसबीआयमध्ये जीएम, डेप्युटी इन्फ्रा सिक्योरीटी आणि स्पेशल प्रोजेक्टस (CISO), इंसिडेंट रिस्पॉन्स आणि असिस्टंट मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. एसबीआय भरती अंतर्गत एकूण 171 पदे भरली जाणार आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सिक्युरिटी अँड स्पेशल प्रोजेक्ट्स) चे 1 पद,DGM (घटना प्रतिसाद) चे 1 पद, सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-सिव्हिल) ची 42 पदे, असिस्टंट मॅनेजर(इंजिनियर-इलेक्ट्रिकल) ची 25 पदे, असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर-फायर)ची 101 पदे आणि सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-सिव्हिल) (अनुशेष) चे 1 पद भरले जाणार आहे. 12 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. या तारखेनंतर आलेले स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.