UP Crime News: पोलिसांच्या छाप्यादरम्यान विष प्राशन केलेल्या आई आणि मुलीचाही मृत्यू, काय आहे हे संपूर्ण प्रकरण

 Crime News:  पोलिसांच्या छाप्यादरम्यान आरोपीची आई आणि बहिणीचाही विष प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचीबाब पुढे आली आहे. 

Updated: May 27, 2022, 08:31 AM IST
UP Crime News: पोलिसांच्या छाप्यादरम्यान विष प्राशन केलेल्या आई आणि मुलीचाही मृत्यू, काय आहे हे संपूर्ण प्रकरण title=

लखनऊ : UP Crime News: बागपत जिल्ह्यातील छपरौली भागात पोलिसांच्या छाप्यादरम्यान आरोपीची आई आणि बहिणीचाही विष प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचीबाब पुढे आली आहे. पोलीस अधीक्षक नीरज जदौन यांनी 26 मे रोजी पीटीआयला सांगितले की, अनुराधा (49) आणि तिची धाकटी मुलगी प्रीती (17) यांनी मंगळवारी छपरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बछोड गावात पोलिसांच्या छाप्यादरम्यान विष प्राशन केले होते. त्यांच्यावरही मेरठमधील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. अनुराधा यांची मोठी मुलगी स्वाती (19) हिचा बुधवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

एसपी नीरज जदौन यांनी सांगितले की, नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे छपरौली पोलीस ठाण्यात नरेश पाल यांच्यासह सहा जणांविरुद्ध छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

3 मे रोजी छपरौली गावातील ग्रामस्थांनी गावातील प्रिन्स नावाचा तरुण आपल्या मुलीसह पळून गेल्याची तक्रार पोलिसांना दिली होती. या प्रकरणी पोलीस सातत्याने मुलाच्या घरावर छापे टाकत होते. मंगळवारी सायंकाळी आरोपी आणि मुलगी गावातच घरी असल्याची माहिती फिर्यादीकडून पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन सायंकाळी उशिरा पोलीस छापा टाकण्यासाठी गेले. दरम्यान, घरात उपस्थित आरोपी तरुणाची आई अनुराधा आणि दोन बहिणींनी सल्फा आणि उंदीर मारणारे औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.