Viral Video: बंगळुरुत (Bengaluru) रिक्षाचालकाने (Rickshaw Driver) बाईक टॅक्सी रायडरशी (Bike Taxi Rider) असभ्य वर्तन करत धमकावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला असून, रिक्षाचालक भरस्त्यात तरुणाला धमकावत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, रिक्षाचालकाने तरुणाकडे असणारे हेल्मेट घेऊन रस्त्यावरच फोडून टाकत आपला संताप व्यक्त केला आहे. हा सगळा घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित बाईक टॅक्सी ड्रायव्हर हा मूळचा ईशान्य भारतातील आहे. रॅपिडोसाठी (Rapido) या बाईक टॅक्सी सेवेसाठी तो काम करतो. दरम्यान, या सेवेमुळे आपले ग्राहक कमी होत असल्याचा संताप या रिक्षाचालकाने व्यक्त केला आहे. व्हिडीओत तो यांच्यामुळे आपला व्यवसाय कमी झाल्याचा आरोप करत आहे.
"मित्रांनो पाहा रॅपिडो कशाप्रकारे बेकायदेशीर व्यवसाय करत आहे. हा तरुण दुसऱ्या देशातून आला आहे आणि इथे राजाप्रमाणे गाडी चालवत आहे," असं रिक्षाचालक व्हिडीओत बोलताना दिसत आहे. ऑटो क्षेत्रासाठी हा मोठा धोका असल्याचा दावाही तो करत आहे.
@indiranagaraps is investigating the incident. Strict and necessary action will be taken. https://t.co/QosaVAF0gO
— ಬೆಂಗಳೂರು ನಗರ ಪೊಲೀಸ್ BengaluruCityPolice (@BlrCityPolice) March 7, 2023
बंगळुरुतील इंदिरा नगर मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी ही घटना घडल्याची माहिती आहे. एका साक्षीदाराने हा व्हिडीओ शूट केला आहे. त्याने नंतर हा व्हिडीओ ट्विटरला शेअर केला. यामध्ये त्याने पोलिसांनाही टॅग केलं होतं. यामुळे पोलिसांनी त्याची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षाचालकाविरोधात कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. "इंदिरानगर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. कडक कारवाई केली जाईल," असं ट्विट पोलिसांनी केलं आहे.