ठाणेकरांच्या डोक्याचा ताप वाढला! रविवारपर्यंत पाणीकपात सुरूच, कोणत्या भागात कोणत्या तारखेला बंद असेल पाणीपुरवठा?

Thane Water Supply : पाणीकपात ठाणेकरांची पाठ सोडेना. नव्या महिन्याचा पहिलाच आठवडाच अडचणींचा. पाहा पाणीकपातीचं वेळापत्रक...   

सायली पाटील | Updated: Dec 3, 2024, 08:16 AM IST
ठाणेकरांच्या डोक्याचा ताप वाढला! रविवारपर्यंत पाणीकपात सुरूच, कोणत्या भागात कोणत्या तारखेला बंद असेल पाणीपुरवठा?  title=
Thane news water shortage and watercut till sunday know areawise timetable and latest updates

Thane News : 2024 या वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला असून, या महिन्याची सुरुवात ठाणेकरांसाठी फारशी चांगली नाही, असं म्हणायला हरकत नाही. कारण ठरतंय ते म्हणजे ठाण्यात लागू असणारी पाणीकपात. मुंबई पालिकेकडून ठाणे पालिकेला मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. याशिवाय दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्यामुळं ठाण्याला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातही घट झाली असल्याचं सांगितलं जात आहे. (Thane Water Supply)

सरासरी 30 टक्के पाणी कपातीमुळे साधारण आठवडाभर ठाणे पालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये टप्प्याटप्प्यानं 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठा बंद ठेवूनच पाणी वितरण केलं जाणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आल्यामुळं आता ठाणेकरांची चिंता वाढली आहे. 

मुंबई पालिकेकडून ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे इथं असणाऱ्या 'न्यूमॅटिक गेट सिस्टीम' या यंत्रणेमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळं या प्रणालीच्या दुरुस्तीचं काम 1 डिसेंबरपासून हाती घेण्यात आलं आहे. परंतु ठाणे पालिकेच्या पम्पिंग स्टेशनवरही याचा परिणाम झाला असून, त्यामुळंच इथं नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. 
ठाणे पालिकेला 30 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागत असून, नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पडू नये यासाठी सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 अशा वेळेत प्रत्येक विभागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. 

कोणकोणत्या भागात कधी बंद असेल पाणीपुरवठा? 

3 डिसेंबर - मानपाडा, कोठारी कम्पाऊंड, ढोकाळी, माजिवाडा, डोंगरी पाडा, विजयनगरी, विजयपार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, मनोरमा नगर, रुणवाल

4 डिसेंबर - सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, गांधीनगर, लोकपूरम, लोक उपवन, गावंड बाग, उन्नती, शास्त्रीनगर 1 आणि 2, एमएमआरडीए, तुळशीधाम, सुरकरपाडा, सिद्धांचल, कोकणीपाडा

5 डिसेंबर - आझाद नगर, खोपट, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, सिद्धेश्वर, चंदनवाडीपाटीलवाडी, चरई, मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळ नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर, भास्करनगर, पौड पाडा, खारेगाव, रघुकुल, पारसिक नगर, कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कळवा, मनीषानगर, आतकोणेश्वर नगर

हेसुद्धा वाचा : Maharashtra Assembly Election : राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? कोणी केलं हे गुपित उघड? 

 

6 डिसेंबर - सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदयनगर, रेतीबंदर

7 डिसेंबर - विकास कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कळवा, मनीषानगर, राबोडी 1 आणि 2, आकाशगंगा, जेल टाकी परिसर, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, आतकोणेश्वर नगर, भास्करनगर, पौड पाडा, खारेगाव, रघुकुल, पारसिक नगर

8 डिसेंबर - रघुनाथनगर, इटर्निटी, विष्णूनगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, मनोरुग्णालय परिसर, रहेजा, कशिश पार्क, शिवाजी नगर, धर्मवीर नगर, साठेवाडी, लोकमान्य पाडा 1 आणि 2, दोस्ती, वेदांत, आकृती संकुल, अरुण क्रीडा मंडळ