नवी दिल्ली : Income Tax Notice : नोकरी करणारा पगारदारवर्ग इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरतो. आता ITR फाइल करण्याची वेळ आली आहे. बहुतांश ऑफिसेसमध्ये फॉर्म 16 जारी करण्यात आला आहे. इनकम टॅक्स भरल्यानंतरही टॅक्सपेअर्सला इनकम टॅक्स विभागाकडून नोटीस येते. नोटीस अनेक प्रकारच्या असतात. इनकम टॅक्स सेक्शन 143(1) अंतर्गत नोटीस पाठवण्यात येणारी नोटीस सर्वसाधारणपणे सर्व टॅक्सपेअर्सला येते. या नोटीसीबाबत घाबरण्यासारखे काही कारण नाही.
इनकम टॅक्स फाइल केल्यानंतर त्याचे वेरिफिकेशन होते. वेरिफिकेशन नंतर सबमिट केल्याने इनकम टॅक्स डिपार्टमेंट त्याची छाननी करतो. नोटीसीमध्ये नमूद करण्यात येते की, तुम्ही भरलेला टॅक्स बरोबर आहे की, चूक! रिटर्न फाइल करताना इंटरेस्ट माहिती चुकीची भरली गेली तरी तुम्हाला IT 143(1) नोटीस ((Income tax notice) येऊ शकते. ही नोटीस सांगते की, रिटर्नमध्ये ज्या चूका आहेत. त्या दुरूस्त करा.
नोटीसचा अर्थ काय?
- जर तुम्ही इंनकम टॅक्स रिटर्न दरम्यान भरलेल्या टॅक्सपेक्षा तुमचे व्यवहार जास्त असेल तर नोटीस येऊ शकते.
- तुम्ही रिटर्न दरम्यान भरलेला टॅक्सपेक्षा तुमचे व्यवहार कमी असल्यास आणि रिटर्न योग्य भरला असल्यास तुम्हाला नोटीस येते.
- जर तुम्हाला अशी कोणतीही नोटीस आली नाही. तर समजा की तुमचा रिटर्न प्रोसेस झालेला नाही.
नोटीसचे उत्तर देण्यास उशीर करू नका?
इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडून नोटीस आली असेल, आणि काही रक्कमेचा भरणा करायचा असेल तर 20 दिवसांच्या आत भरणा करा. असं न केल्यास 30 दिवसांनंतर तुम्हा मासिक 1 टक्का व्याजासह ITR भरावा लागेल.