पोळी किंवा चपाती का फुगते? हे कारण तुम्हाला माहीत आहे का?

पोळी किंवा रोटीमध्ये असं काय असतं ज्यामुळे ती खूप छान फुगते, हे कारण तुम्हाला माहीत आहे का? 

Updated: Jul 26, 2021, 11:10 PM IST
पोळी किंवा चपाती का फुगते? हे कारण तुम्हाला माहीत आहे का? title=

मुंबई: आपण सर्वजण रोटी किंवा चपाती किंवा पुरणपोळी खातो तेव्हा ती बनताना क फुगते याचा विचार आपल्या मनात कधी येतो का? आला असेल तरी आपण म्हणतो त्यात काय वाफेमुळेच ती फुगत असेल असं म्हणून सोडून देतो. अनेकदा असं म्हटलं जातं की पोळी फुगली की ती वातट होत नाही उलट छान लागते पण ती का फुगत असेल याचं आज आपण नेमकं कारण जाणून घेणार आहोत. 

चपाती फुगण्यामागे कोणतंही रॉकेट सायन्स नाही. तर चपाती पुगण्यामागे कार्बन डायऑक्साइड गॅस हे खरं कारण आहे. जेव्हा तुम्ही कणीक मळून त्याचे गोळे करता तेव्हा त्यामध्ये प्रोटन आणि ग्लूटेन तयार होतं. ग्लूटेनची सर्वात खास गोष्ट ही असते की तो आपल्या आतमध्ये कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो. 

ग्लूटेनयुक्त कणकेची पोळी किंवा चपाती तयार केली जाते आणि शेकण्यासाठी जेव्हा आपण गॅसवर ठेवतो तेव्हा ती फुगते. ती अलटून पलटून चांगली भाजली जाते. जेव्हा ती फुगते तेव्हा त्याच्या आतमध्ये गॅस तयार होत असते. जेव्हा पोळी खाली उतरवली जाते तेव्हा त्यातली वाफ काढून टाकली जाते. 

गहूच्या कणकेमध्ये ग्लूटेनचं प्रमाण अधिक असते. त्यामुळे गव्हाची पोळी किंवा रोटी ही तव्यावर जास्त फुगते असं म्हटलं जातं. बाजरी आणि मक्याची रोटी ही जास्त फुगत नाही. भाकरी करताना आपल्याला थेट गॅसवर तिला भाजावं लागतं. कारण त्यामध्ये ग्लूटेन तयार होत नाही असं म्हटलं जातं. मात्र रोटीला भाजताना खाली जाळी ठेवून किंवा तवा ठेवून भाजलं जातं.