लंडन : आरामाची प्रचंड आवड असलेल्या लोकांकरता नोकरीची सुवर्णसंधी. या नोकरीत तुम्ही झोपू शकता, लोळू शकता. अगदी आवडीचे प्रोग्राम देखील पाहू शकता. हे सगळं केलं तरीही तुमच्या अकाऊंटमध्ये नोकरी क्रेडिट होणार आहे. महत्वाची बाब ही आहे की, ही नोकरी घरी बसून करू शकता. याकरता तुम्हाला कोणत्या ऑफिसला जायची गरज नाही.
'द सन'च्या अहवालानुसार, लक्झरी बेडिंग कंपनी 'क्राफ्टेड बेड्स' मॅट्रेस टेस्टरची नियुक्ती करत आहे. यामध्ये लोकांना गाद्यांवर झोपायचं आहे. त्यानुसार ते सांगणार गाद्या कशा आहेत आणि त्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे. या कामासाठी कंपनी वार्षिक 24,000 पौंड (सुमारे 25 लाख रुपये) देईल. या काळात तुम्हाला आठवड्याभरात उच्च दर्जाच्या गादीची चाचणी करायची आहे.
कंपनीला असे वाटते की, त्यांच्या गाद्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागू नये. या गाद्या बाजारात आणण्यापूर्वी सर्व चाचण्या करायच्या आहेत. यासाठी 'मॅट्रेस टेस्टर' पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
नोकरी करणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण आठवडा 37.5 तास गादीवर पडून राहावा लागेल. क्राफ्टेड बेड्सचे मार्केटिंग मॅनेजर ब्रायन डिलन म्हणाले, “ग्राहकांचे समाधान हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही 'मॅट्रेस टेस्टर' नियुक्त करत आहोत, जेणेकरून गाद्याची गुणवत्ता कळू शकेल.
ब्रायन डिलन यांनी सांगितले की ही पूर्णपणे रिमोट जॉब आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही. गाद्या त्यांच्या घरी पोहोचवल्या जातील. ते म्हणाले की नोकरी मिळवण्यासाठी अर्जदाराला काही अटी पूर्ण कराव्या लागतात. सर्व प्रथम, तो ब्रिटनचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तो कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय एकट्या गादीची चाचणी करण्यास सक्षम असावा. या व्यतिरिक्त, त्याच्याकडे उत्तम संभाषण कौशल्य असावे, जेणेकरून तो आम्हाला गद्दा चाचणीची माहिती लिखीत स्वरूपात पाठवू शकेल.